🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडमध्ये संरक्षित व दुर्मिळ ‘बो माऊथ गिटार फिश’ची शिकार उघडकीस; व्हिडिओ प्रसारणावरून वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल

 

समुद्रात शिकार करून कराडमध्ये आणण्यात आलेला दुर्मिळ व संरक्षित 'बो माऊथ गिटार फिश'
Bowmouth Guitarfish

कराड | चांगभलं वृत्तसेवा


कराड व सातारा परिसरात अत्यंत दुर्मिळ आणि संरक्षित ‘बो माऊथ गिटार फिश’ (Bowmouth Guitarfish) या जलचर प्रजातीच्या शिकार व प्रदर्शनाचा प्रकार उघडकीस आला असून, सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्मिळ आणि संरक्षित माशाच्या या शिकार प्रकरणावरून पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव तज्ज्ञांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.


वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कराड येथील समुद्रातील मासे विक्रीशी संबंधित अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर, कराड) आणि सातारा येथील ओमकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरवार पेठ, सातारा) यांनी संबंधित माशाचा व्हिडिओ प्रसारित करून प्रदर्शन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वन विभागाने तात्काळ कारवाई करत संशयितांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.


शेड्युल-१ मधील संरक्षित प्रजाती...

बो माऊथ गिटार फिश ही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ च्या शेड्युल-१ (भाग E) मध्ये समाविष्ट आहे. तसेच IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) संस्थेने या माशाला ‘Critically Endangered’ घोषित करून रेड डेटा लिस्ट मध्ये स्थान दिले आहे. अशा प्रजातींची शिकार, पकड, वाहतूक, विक्री किंवा सार्वजनिक प्रदर्शन करण्यास कायद्याने सक्त मनाई आहे.


डिजिटल पुरावे तपासणीच्या कक्षेत...

या प्रकरणात सोशल मीडियावर प्रसारित व्हिडिओंचा तपास, संबंधित मोबाईल, डिजिटल साधने तपासणी, मासा जप्ती व पंचनामा प्रक्रिया, शिकार कशी, कुठे व कोणाच्या सहभागातून झाली याचा सखोल तपास, अशा सर्व बाबींचा समावेश चौकशीत करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


वन विभागाची तत्पर कारवाई...

सदर कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाई करणाऱ्या पथकामध्ये सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनपाल सुनिल शिंदे, वनरक्षक कैलास सानप, वनरक्षक अभिजीत शेळके, वनरक्षक अक्षय पाटील आणि वनरक्षक मुकेश राऊळकर यांचा सहभाग होता.


जनजागृतीचा इशारा...

वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन अनवधानाने झाले तरी तो गुन्हा ठरू शकतो, असा इशारा वनविभागाने दिला आहे. नागरिकांनी अशा दुर्मिळ प्रजाती आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणेही गुन्ह्याचा भाग ठरू शकतो, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.



दुर्मिळ जलचर प्रजातींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर...

कराड व सातारा परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे दुर्मिळ जलचर प्रजातींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वन विभागाकडून चौकशीला वेग देण्यात आला आहे.


प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सर्व काही....


या प्रकरणातील संशयित कराडमध्ये आणि सातारा मध्ये समुद्रातील मासे विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाची जाहिरात सोशल मीडियावर करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून वन्यजीव कायद्यान्वये संरक्षित असलेल्या 'बो माऊथ गिटार फिश'ची शिकार झाल्यानंतर मासे विक्री व्यवसायाच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी‌ या माशाची कराडमध्ये रील बनवण्यात आली होती. तर सातारामध्ये त्याचे प्रदर्शन करण्यात आले. आणि उघड्यावर फिरविलेला मासा नंतर विक्री करण्याचा प्रयत्नही झाला, असे समजते. यानिमित्ताने मासे विक्री करणाऱ्यांनी कायद्यान्वये दुर्मिळ आणि संरक्षित असलेल्या जलचर प्रजातींची शिकार आणि त्याची प्रदर्शन होऊ नये , यासाठी दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे या प्रकर्षाने समोर आले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#BowmouthGuitarfish #GuitarFishCase #वन्यजीवगुन्हा #वन्यजीवसंरक्षणकायदा #WildlifeCrime #CriticallyEndangered #IUCNRedList #ForestDepartmentAction #कराड #सातारा #KaradNews #SataraNews #ChangbhalaNews #WildlifeAwareness #DigitalEvidence #SocialMediaCrime

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या