🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सचिन बुरुंगले उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित | अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराडतर्फे गौरव

सचिन बुरुंगले उद्योग रत्न पुरस्कार स्वीकारताना | अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड आयोजित पुरस्कार वितरण सोहळा
Photo - changbhala-news.blogspot.com


कराड | चांगभलं वृत्तसेवा 
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हर्ष लॉजिस्टिक्स कंपनी नवी मुंबई चे चेअरमन मा. सचिन बुरुंगले यांना उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मा. डॉ. इंद्रजित यशवंतराव मोहिते (उपाध्यक्ष, भारती विद्यापीठ पुणे) यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे, डॉ. अशोक गुजर (संस्थापक अध्यक्ष, डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेज, कराड), मा. राजेंद्र आण्णासाहेब डांगे (गव्हर्निंग कौन्सिल मेंबर, अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा), प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ, प्राध्यापक रवींद्र कोकरे, प्राध्यापक साहेबराव चौरे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, रोहित येडगे, रामचंद्र पोकळे, आनंदराव कचरे, प्राध्यापक शीतल काकडे, प्रा. डॉ. अहिल्या वाघमोडे, सौ. कल्याणी बुरुंगले, कैलास काकडे, अंशुमन काकडे, तन्मय खरात, राजवर्धन भोसले, सार्थ झेले, आदित्य भोईटे, इंद्रजीत ताटे, सतीश थोरात, प्राध्यापक कुमार देवकाते, योगेश कुरले, महेश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. समारंभात विद्यार्थ्यांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. समाजकारण, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल उपस्थितांनी मा. सचिन बुरुंगले यांच्या कार्याचे कौतुक केले

#ChangbhalaNews #SataraNews #KaradNews #AhilyadeviHolkarJayanti #UdyogRatnaPuraskar #SachinBurungle #HarshLogistics #IndustryAward #AhilyadeviTrustKarad #SocialDevelopment #EducationalTrust #KaradEvents #BhartiVidyapeeth #AwardCeremony #UdyogPuraskar #SataraUpdates #MaharashtraIndustry

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या