🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड नगरपालिकेसाठी काँग्रेसची तयारी सुरू | वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू — अध्यक्ष ऍड. अमित जाधव

 

ऍड. अमित जाधव — कराड शहर काँग्रेस अध्यक्ष, कराड नगरपालिका निवडणूक तयारीदरम्यान वक्तव्य करताना
Adv. Amit Jadhav

कराड | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. शहरात “काँग्रेसचे अस्तित्व आहे का?” अशी चर्चा सध्या सुरू असली तरी, गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निर्णायक मते मिळाल्याचे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रियपणे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कराड शहर काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक तयारी केली जात आहे.

“जरी काँग्रेससाठी सध्या संघर्षाचा काळ असला, तरी पक्षाची वैचारिक परंपरा आणि जनतेशी असलेले नाते या संघर्षातून निश्चितच नवा मार्ग काढेल,” असा विश्वास काँग्रेसचे कराड शहर अध्यक्ष ऍड. अमित जाधव यांनी व्यक्त केला.

त्यांनी पुढे सांगितले की, “कराड शहरात काँग्रेसचा भक्कम कार्यकर्ता वर्ग आहे. विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन करेल.”


#KaradElection #CongressKarad #AmitJadhav #KaradPolitics #ChangbhalaNews #KaradMunicipality #PoliticalNews #MaharashtraPolitics #KaradCongress #LocalBodyElection

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या