कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
विजय दिवस समारोह समितीच्या वतीने दरवर्षी १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध राष्ट्रीय, सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सातारा जिल्हा शिवसेना उपप्रमुख नितीन काशीद यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वोच्च सामाजिक दान असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते, असे प्रतिपादन केले.
शिबिरात तरुणांसह विविध वयोगटातील अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळते, ही भावना मनात ठेवून रक्तदात्यांनी आपले पवित्र कर्तव्य पार पाडले.
याप्रसंगी विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचिव विलासराव जाधव, संचालक चंद्रकांत जाधव, सलिम मुजावर, प्रा. भगवान खोत, प्राचार्य गणपतराव कणसे, रत्नाकर शानभाग, प्रा. जालिंदर काशिद, बुरुंगले सर, प्रा. सतीश उपळावीकर, पौर्णिमा जाधव, शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल रक्तदान शिबीर प्रमुख रमेश पवार सर यांनी सर्व रक्तदाते, आयोजक, सहकारी व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
#VijayDiwas
#BloodDonationCamp
#KaradNews
#ChangbhalaNews
#SocialResponsibility
#Raktadan
#NationalService
#KaradUpdates
#SamajikUpakram
#VijayDiwasSamiti


0 टिप्पण्या