🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

‘जयवंत शुगर्स’कडून पहिल्या पंधरवड्याचे ३५.१६ कोटी ऊस बिल जमा

 

जयवंत शुगर्सने पहिल्या पंधरवड्याचे ३५.१६ कोटी ऊस बिल प्रतिटन ३५०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली माहिती

शेतकऱ्यांतून समाधान; ऊसदराबरोबरच ऊस बिल वाटपातही ‘जयवंत’चा पुढाकार

कराड, प्रतिनिधी|दि. ३ डिसेंबर २०२५|चांगभलं वृत्तसेवा

धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन ३५०० रुपयांप्रमाणे एकूण ३५.१६ कोटींचे बिल, ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जिल्ह्यात सर्वांत प्रथम ऊसदराची कोंडी फोडून प्रतिटन ३५०० रुपयांचा दर जाहीर करत ऊसदरात आघाडी घेतली. आता जयवंत शुगर्सने ऊसबिल वाटपातही आघाडी घेत, जिल्ह्यात साखर कारखानादारीत अनोखा आदर्श घालून दिला आहे. कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या ऊसापोटी प्रतिटन ३५०० प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ३५ कोटी १६ लाख रुपये जमा केले आहेत.

जयवंत शुगर्सने नेहमीच शेतकरी केंद्रित धोरणे घेत आणि व्यवस्थापनातील सातत्य ठेवत ऊस उत्पादकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. तसेच कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी ऊस उत्पादकांना चांगला दर देत, वेळेत ऊस बिल जमा करण्याची परंपरा जोपासली आहे. पहिल्या पंधरवड्याचे बिल ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार लाभला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

#JaywantSugars #UsBill #SakharKarkhana #KaradNews #ChangbhalaNews #DrSureshBhosale #Usadar3500 #SugarcaneFarmers #UsUtpadak #SataraNews #MaharashtraAgriculture #UsGaḷit2025 #FarmersUpdate #JaywantSugarsNews 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या