🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा कॅम्पसला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व आमदार विक्रम काळे यांची सदिच्छा भेट; डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडून स्वागत

 

Karad – Cooperation Minister Babasaheb Patil and MLA Vikram Kale being welcomed by Dr. Suresh Bhosale at Krishna Campus during goodwill visit

कराड प्रतिनिधी, दि. ४ डिसेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा


राज्याचे सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील आणि छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी आज कृष्णा कॅम्पसला सदिच्छा भेट दिली. यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांचे स्वागत करत, कृष्णा कॅम्पसमधील विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले व सौ. गौरवी भोसले उपस्थित होत्या.

सहकारमंत्री ना. पाटील आणि आ. काळे आज कराडला आले असता, त्यांनी कृष्णा कॅम्पसला सदिच्छा भेट दिली. यावेळी कृष्णा बँकेच्या प्रधान कार्यालयात बँकेचे चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आ.डॉ. भोसले यांनी कृष्णा आर्थिक परिवाराच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. कृष्णा बँकेने ग्राहकांचे हित जपत अनेक नाविण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. बँकेच्या कर्ज योजनांमुळे अनेकांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे. तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत, ग्राहकांना तंत्रसुलभ सेवा देण्यासाठी बँकेचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सांगितले. याशिवाय कृष्णा हॉस्पिटल आणि कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा व शिक्षणविषयक उपक्रमांचीही माहिती देण्यात आली. ना. पाटील यांनी कृष्णा समूहाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत, संस्थेचा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 



याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील-वाठारकर, कृष्णा बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्थेचे संचालक वसीम मुल्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कृष्णा महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक नितीन देसाई, वित्तपेटा मल्टिस्टेट सोसायटीचे व्यवस्थापक सुजीत माने, भाजपाचे राज्य परिषद सदस्य संजय पवार, मंडल अध्यक्ष शंकर निकम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.



#KaradNews #ChangbhalaNews #KrishnaCampus #BabasahebPatil #VikramKale #AtulbabaBhosale #KrishnaBank #KrishnaHospital #KrishnaUniversity #SataraNews #PoliticalVisit #MaharashtraNews #CooperationMinister #KaradUpdates



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या