🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

'सह्याद्रि' कडून २६.४० कोटींचे ऊस बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा

 

सह्याद्रि सहकारी साखर कारखाना आणि चेअरमन बाळासाहेब पाटील

रास्त भाव देण्याची 'सह्याद्री'ची परंपरा कायम


कराड प्रतिनिधी, दि. ५ डिसेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा


ऊस गाळप, साखर उत्पादन आणि आर्थिक व्यवस्थापनात अग्रेसर असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामामध्ये नोव्हेंबर, २०२५ मधील पहिल्या पंधरवड्यातील कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसास प्रति में टन रूपये ३५००/- प्रमाणे एकूण रूपये २६ कोटी ४० लाख ऊस बिलाची रक्कम शेतक-याच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजीत विजयसिंह शिदे यांनी दिली.

कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात आलेल्या ऊसापोटी प्रति मे टन रूपये ३५००/- प्रमाणे एकूण रूपये २६ कोटी ४० लाख ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 'सह्याद्रि'ने नेहमीची रास्त भाव देण्याची परंपरा याही गळीत हंगामात जोपासलेली आहे. 

ऊसाच्या बिलाची रक्कम जमा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळालेला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक शेतक-यांनी त्यांनी पिकविलेला सर्व ऊस सह्याद्रि कारखान्याकडे गळीतास पाठवून जास्तीत जास्त ऊस गळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 

दरम्यान, 'सह्याद्रि'चे चेअरमन माजी मंत्री श्री बाळासाहेब पाटीत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सरू आहे.


#SahyadriSugarFactory #ऊसबीलवितरण #UsBillUpdate #SugarFactoryNews #SahyadriKarad #BalasahebPatil #ChangbhalaNews #KaradUpdates #SahakariSugar #FarmerNews #SataraNews #UsUtpadakSheti #KaradTaluka #MalkapurNews #UsGhalap2025 #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या