🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे २१ डिसेंबरला ‘कृष्णा मॅरेथॉन’चे भव्य आयोजन

 

कृष्णा मॅरेथॉन 2025 लोगो – कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड आयोजित आरोग्यदायी धाव स्पर्धा

कराड प्रतिनिधी | दि. ६ डिसेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा


: कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे ‘कृष्णा मॅरेथॉन २०२५’ या आरोग्यदायी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन २१ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कृष्णा विश्व विद्यापीठ परिसरातून सुरू होणार आहे.

आप्पासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत, त्यांच्या सामाजिक कार्याला आणि लोकाभिमुख विचारांना अभिवादन म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. या मॅरेथॉनमध्ये १० किमी आणि ५ किमी असे दोन गट ठेवण्यात आले असून, नोंदणीसाठी प्रत्येकी ३२० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. सहभागींसाठी वयोगटानुसार स्वतंत्र श्रेणी निर्माण करण्यात आल्या असून, १८ वर्षांखालील तसेच १९ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ वर्षांपुढील अशा पाच वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.

धावपटूंना स्पर्धेचा उत्तम अनुभव मिळावा, यासाठी कृष्णा विद्यापीठामार्फत प्रत्येक स्पर्धकाला मेडल, मॅरेथॉन बिब, टी-शर्ट, फिजिओथेरपी सपोर्ट, वैद्यकीय मदत, नाश्ता, तसेच प्रत्येक दोन किलोमीटरवर हायड्रेशन पॉइंट्स अशा सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. शर्यत पूर्ण करणाऱ्या सर्वांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेसाठी मार्ग व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवकांचे जाळे आणि वैद्यकीय यंत्रणा यांचीही काटेकोर तयारी केली जात आहे.

कृष्णा मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्याकडे वाटचाल करण्याचा आणि समाजमनात सकारात्मकता रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १४ डिसेंबरअखेर ओंकार ढेरे (मोबा. ९०७५२२५६५३) अथवा अभिजीत रैनाक (मोबा. ९७६६७१००९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कृष्णा मॅरेथॉन 2025
Krishna Marathon 2025
Krishna University Marathon
कृष्णा विश्व विद्यापीठ कराड
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले जयंती
मॅरेथॉन कराड
कराड रनिंग इव्हेंट 2025
Marathon Registration Karad
Krishna Marathon Registration
Krishna University Events
Health Marathon Maharashtra


#KrishnaMarathon2025 #KrishnaUniversity #KaradNews #ChangbhalaNews #KaradMarathon #Marathon2025 #KrishnaCampus #JayawantraoBhosale #KaradEvents #HealthAndFitness #MarathonIndia #SataraDistrict #RunForHealth #KaradUpdates #KaradLive #ChangbhalaLive


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या