🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

काशीतील मणिकर्णिका घाटावर बुलडोझर फिरवून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा पुसण्याचा प्रयत्न – भाजपच्या योगी सरकारचा धनगर महासंघाकडून तीव्र निषेध

 

काशीतील मणिकर्णिका घाट तोडफोड प्रकरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती नष्ट केल्याचा आरोप करत धनगर समाजाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

काशी (वाराणसी) येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी सरकारचा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती व ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा भाजपने हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप महासंघाचे नेते प्रवीण काकडे यांनी केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर १२,६७२ मंदिरे, धर्मशाळा, घाट व अन्नछत्रे उभारून धार्मिक-सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला. त्यांनी बांधलेल्या सहा प्रसिद्ध घाटांपैकी एक असलेला काशीतील मणिकर्णिका घाट उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने वाराणसी कॉरिडोरच्या नावाखाली बुलडोझरने जमीनदोस्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
इतकेच नव्हे, तर इ.स. १७९१ मध्ये स्थापन करण्यात आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ऐतिहासिक मूर्तीही नष्ट करण्यात आल्याचे समोर येत आहे. हा प्रकार केवळ वास्तूंची तोडफोड नसून, देशातील महान स्त्रीशासकाचा इतिहास पुसण्याचा सुनियोजित डाव असल्याची भावना धनगर समाजासह विविध जाती-धर्मातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

“एकीकडे महापुरुषांच्या स्मृती जतन करण्याचे भाषण करायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच स्मारकांवर बुलडोझर चालवायचा, हा भाजप सरकारचा दुटप्पीपणा आहे,” असा घणाघाती आरोप महासंघाच्यावतीने करण्यात आला आहे.

अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी संपूर्ण देशभर साजरी होत असताना, त्यांच्या वारशालाच लक्ष्य करणे हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे, असे मत महासंघाकडून नोंदविण्यात आले आहे.
या घटनेमुळे धनगर समाजासह विविध सामाजिक, धार्मिक घटकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारांनी तात्काळ थांबवाव्यात, मणिकर्णिका घाटावरील ऐतिहासिक वारसा पुनर्संचयित करावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली आहे.

भाजपचे योगी सरकार व केंद्रातील भाजप प्रणित सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालावे, अन्यथा राज्यासह देशभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#ManikarnikaGhat #AhilyabaiHolkar
#धनगरसमाज #काशीवारसा #BJPExposed
#YogiGovernment #BulldozerPolitics
#CulturalVandalism #HistoricalInjustice
#SaveHeritage #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या