🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा समाजोपयोगी उपक्रम; ऊसतोड व वीटभट्टी कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर

 

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमकडून ऊसतोड कामगार व वीटभट्टी मजुरांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिर व साहित्य वाटप उपक्रम

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम तर्फे समाज घटकातील मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या वीट भट्टी कामगार, ऊसतोड कामगार महिलासाठी बीपी (रक्तदाब)व मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.

तपासणीनंतर जंतनाशक गोळ्या, रक्त वाढीच्या गोळ्या, प्रोटीन पावडर ,पित्तनाशक औषधे तसेच इतर आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. याचबरोबर मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, नेल कटर ,कंगवा, आरसे ,खेळणी यांचे वाटप करण्यात आले ,या उपक्रमासाठी अवनी संस्थेच्या राधिका लोखंडे मॅडम तसेच डॉ. नलिनी मोरे,डॉ. अनिता पाटील,डॉ.अर्चना माने व त्यांच्या सर्व सहकार्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ,तसेच क्लब सदस्या छाया पवार, सारिका शहा ,निमिषा गोर, जया सचदेव ,मुस्कान तलरेजा, सारिका कदम ,विजयश्री मोहिते, अनिता शुक्ला ,अंजना माने , सुकेशीनी कांबळे, अनिता कुंभार यांच्या सहकार्यामुळे उपक्रम प्रेरणादायी ,यशस्वी ठरला.या सामाजिक उपक्रमावेळी क्लब अध्यक्षा सारिका शहा, सेक्रेटरी निमिषा गोर, हेमलता फुटाणे ,नंदा आवळकर ,श्रुती जोशी, तरुणा मोहिरे ,सारिका कदम, वैशाली शहा, सुवर्णा केंजळे आदी सदस्य उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#InnerWheelClub #KaradSangam
#SocialWork #HealthCamp
#FreeMedicalCamp #SugarcaneWorkers
#BrickKilnWorkers #WomenHealth
#ChildCare #CommunityService
#KaradNews #SataraNews #MarathiNews
#ChangbhalaNews



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या