🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

वडिलांच्या खूनाच्या आरोपातून मुलाची निर्दोष मुक्तता वडूज जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

वडूज जिल्हा व सत्र न्यायालय, कोर्ट सिम्बॉल – वडीलांच्या खून प्रकरणात मुलाची निर्दोष मुक्तता करणारा न्यायालयीन निकाल


वडूज | चांगभलं वृत्तसेवा

वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पवन संपत सत्रे याची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. पवन याच्यावर त्याचे वडील संपत सत्रे यांचा खून केल्याचा आरोप होता.

खटल्याची हकीगत अशी, सदर घटना 16 फेब्रुवारी 2012 रोजी रात्री सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ( दरजाई, ता. खटाव, जि. सातारा ) गावाच्या हद्दीतील ‘मळा’ नावाच्या शिवारात घडली होती. आरोपी व मयत दोघेही दरजाई गावचे रहिवासी होते. प्रारंभी या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान संशयित आरोपी पवन सत्रे व त्याच्या मित्राचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयासमोर विविध पुरावे सादर करण्यात आले. त्यामध्ये भारतीय पुरावा कायदा कलम 27 अन्वये आरोपीकडून रक्त लागलेले लाकडी दांडके तसेच रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता. या कपड्यांवर आढळलेले रक्त ए.बी. ब्लड ग्रुपचे असून मयत व्यक्तीचाही ब्लड ग्रुप ए.बी.असल्याचे सरकार पक्षाने नमूद केले. त्यामुळे आरोपीच्या कपड्यांवरील रक्त हे मयताचेच असल्याचा दावा करण्यात आला.
याशिवाय खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात साक्ष देताना, आपण आरोपींना घटनास्थळाजवळ हातात दांडके घेऊन पळून जाताना पाहिल्याचे सांगितले. मात्र बचाव पक्षाने घेतलेल्या उलटतपासणीत सदर साक्षीदाराने काही महत्त्वाच्या कबुल्या दिल्याने त्याची साक्ष अविश्वासार्ह ठरली.

बचाव पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या युक्तिवादात असे नमूद करण्यात आले की, जप्त केलेले कपडे पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे त्यावर मयत व्यक्तीचे रक्त नंतर शिंपडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उलटतपासणीदरम्यान या पुराव्यांबाबत शंका निर्माण झाल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदविले.
सरकार पक्षाचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने आरोपी पवन संपत सत्रे याची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.
या खटल्यात पवन सत्रे यांच्यासाठी ॲड. तुषार माने यांनी, तर सौरभ कदम याच्यासाठी ॲड. एस. एन. जाधव यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#VadujCourt #SataraDistrict
#DistrictAndSessionsCourt
#MurderCaseVerdict #NotGuilty
#CourtVerdict #JudicialDecision
#LegalNews #CrimeNewsMarathi
#MarathiCrimeNews #SataraNews
#KhatavTaluka #DarjaiVillage
#CourtSymbol #JusticeSystem
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या