कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मुंबईस्थित रहिवाशांनी व्यक्त केला आहे. येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मुंबईकरांचा स्नेहमेळावा नवी मुंबईतील घणसोली येथील सभागृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उपस्थित मुंबईकरांनी स्वर्गीय लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्यासाठी एकसंघपणे उभे राहण्याची भूमिका मांडली.
यावेळी ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, नितीन थोरात आणि वृषाली पाटील यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासह कराड दक्षिण मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचा ठाम निर्धार मुंबईस्थित रहिवाशांनी व्यक्त केला.
या स्नेहमेळाव्यास नवी मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेविका दिशा कचरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, समाजाचे माजी उपसरपंच सचिन थोरात, रयत कारखान्याचे संचालक बाजीराव शेवाळे, दिनकर शेवाळे, नारायण शिंदे, तानाजी शेल्टे, रमेश मोहिते, माजी सरपंच दादासो जगताप, संदीप खोचरे, कांतीलाल बागल, अनिल मोहिते, ज्ञानदेव चव्हाण, प्रकाश शेवाळे, सचिन देसाई, रोहित पाटील, राजाराम पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले की, “विलासकाकांचा विचार हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो एक व्यापक चळवळ आहे. त्या विचारांशी आमची नाळ कायम जोडलेली असून भविष्यातही एकसंघपणे उभे राहून सरंजामदार आणि भांडवलशाही प्रवृत्तींचा पराभव करू.”
मतदारसंघाच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “कराड दक्षिणच्या विकासासाठी आम्ही नेहमीच आग्रही राहिलो असून आतापर्यंत १८ ते १९ कोटी रुपयांची विकासकामे राबवली आहेत. पुढील काळातही विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात माहिती देताना उदयसिंह पाटील म्हणाले की, “मी स्वतः जिल्हा परिषदेसाठी उमेदवार असून जळगाव गणातून नितीन थोरात आणि पुरुषालाई पाटील हे उमेदवार आहेत. या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी ताकदीनिशी काम करावे,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या वेळी मुंबईस्थित रहिवाशांनी मोठ्या उत्साहात ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे स्वागत केले. यावेळी गणेश मोहिते, प्रशांत पाटील, दिनकर शेवाळे, रमेश मोहिते, सुरेश शेवाळे, कांतीलाल बागल, प्रा. डांगे सर आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत उदयसिंह पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमितराज चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन माने यांनी केले. या स्नेहमेळाव्यास मुंबईस्थित रहिवाशांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान, नवी मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दमयंती शेवाळे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संपतराव शेवाळे यांच्या निवासस्थानी ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी भेट देत सौ. दमयंती शेवाळे यांचा सत्कार केला. तसेच संपतराव शेवाळे यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उदयसिंह पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराडदक्षिण #राष्ट्रवादीकाँग्रेस #उदयसिंहपाटीलउंडाळकर
#मुंबईकरांचानिर्धार #जिल्हापरिषदनिवडणूक
#येळगावगण #नितीनथोरात #वृषालीपाटील
#विलासकाकापाटील #राजकीयमेळावा
#कराडराजकारण #ChangbhalaNews


0 टिप्पण्या