🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मुख्यमंत्र्यांकडून कराड पंचायत समितीत सत्ता आणल्याबद्दल आमदार अतुलबाबा भोसले यांच्यासह नूतन सभापतींचे अभिनंदन

 

मुंबई : कराड पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस. बाजूस आ.डॉ. अतुलबाबा भोसले, मनोहर शिंदे, ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, शंकरराव खबाले, सचिन पाचपुते, अरुण यादव व अन्य मान्यवर.

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड पंचायत समितीत प्रथमच भाजपाची सत्ता आणल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचे विशेष अभिनंदन केले. कराड तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळवून देण्यासाठी, राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

कराड पंचायत समितीवर तब्बल ६४ वर्षानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. सोमवारी (दि. १६) झालेल्या निवड प्रक्रियेत भाजपाच्या सौ. नंदाताई यादव यांची नूतन सभापती म्हणून निवड झाली. या निवडीमुळे कराड तालुक्यात भाजपाला नवे बळ मिळाले आहे.

या निवडीनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सौ. नंदाताई यादव यांनी मुंबई येथे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी त्यांचा सत्कार करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार डॉ. भोसले यांनीही या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत, कराड तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.

नूतन सभापती सौ. यादव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना जनतेने आणि पक्षाने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आ.डॉ. अतुलबाबांच्यामुळे मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली असून, या पदाला न्याय देत, कराड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे नमूद केले.

दरम्यान, सौ. यादव यांनी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे, सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांची भेट घेतली. या मान्यवरांनी सभापती निवडीबद्दल सौ. यादव यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, माजी जि.प. सदस्य शंकरराव खबाले, सचिन पाचपुते, अरुण यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या