🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

निवड होताच ॲक्शन मोडवर! सभापती नंदाताई यादव थेट आमदार अतुलबाबांच्या समवेत पाणी प्रश्नासाठी मंत्रालयात

 

मुंबई येथे उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर चर्चा करताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सभापती नंदाताई यादव आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत अधिकारी वर्ग

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आज मंत्रालयात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेतली. यावेळी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करुन, ही योजना येत्या महिन्याभरात कार्यान्वित करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या योजनेअंतर्गत येणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरुपी सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी १० मार्च रोजी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी अधिवेशन संपण्यापूर्वी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

त्यानुसार आज मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आ.डॉ. भोसले, कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदाताई यादव, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व पं.स. सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

बैठकीत प्रारंभी आ.डॉ. भोसले यांनी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबतचे वास्तव चित्र पाणीपुरवठा मंत्र्यांसमोर सादर केले. ते म्हणाले, उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झाला आहे. पण दरम्यानच्या काळात या योजनेअंतर्गत समाविष्ट १७ गावांपैकी काही गावांनी स्वतःच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवल्यामुळे, त्या गावांना आता या प्रादेशिक योजनेतील पाण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे योजनेच्या मूळ आराखड्यात आवश्यक बदल करून, प्रत्यक्षात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना या योजनेतील पाण्याचा लाभ देणे आवश्यक आहे. उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध झाल्यास ही योजना लवकर कार्यान्वित होऊ शकते. तसेच याचा लाभ कराड दक्षिणमधील कोयना वसाहत, नांदलापूर या गावांसह मलकापूर शहराच्या विस्तारित भागालाही करुन देता येईल.

 



यानंतर पाणीपुरवठा मंत्री ना. पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योजनेच्या कामाचा आढावा घेऊन, अपूर्ण कामे ताबडतोब पूर्ण करण्याचे आदेश बजाविले. तसेच येत्या महिन्याभरात ही योजना कार्यान्वित करावी, अशी स्पष्ट सूचना केली. यासाठी आवश्यक निधीची तरतूद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. तसेच योजना कार्यान्वित झाल्यानंतर कोयना वसाहत, नांदलापूर या गावांसह मलकापूर शहराच्या विस्तारित भागाला या पाण्याचा लाभ मिळवून देण्याबाबतचा आराखडाही तातडीने सादर करावा, असे अधिकाऱ्यांना सांगितले.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे मंत्रालय स्तरावर पाणीपुरवठा मंत्र्यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन, कार्यवाहीच्या सूचना दिल्याने उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. तसेच या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

यावेळी माजी जि.प. सदस्य शंकरराव खबाले, सचिन पाचपुते, अरुण यादव यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणीपुरठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



महिन्याभरात योजना कार्यान्वित करा; उद्‌घाटनाला मी येणार..!

उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करुन, ही योजना महिन्याभरात कार्यान्वित करा, असे स्पष्ट आदेश पाणीपुरवठा मंत्री. ना. गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच या योजनेच्या उद्‌घाटनासाठी स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.



निवड होताच कामाला सुरुवात; सभापती सौ. नंदाताई यादव यांची तत्परता

कराड पंचायत समितीच्या सभापतीपदी नुकतीच निवड झालेल्या भाजपाच्या सौ. नंदाताई यादव यांनी पदभार स्वीकारताच कामाचा वेग दाखवला आहे. निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी कराड तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणी प्रश्नावर मंत्रालयीन पातळीवरील बैठकीला मुंबईत हजेरी लावली. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत त्यांनी या बैठकीत सहभाग घेत, कराड तालुक्यातील पाणीटंचाई, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या यावर सविस्तर चर्चा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या