कराड प्रतिनिधी |
सातारा येथे आयोजित अटल टिंकरिंग लॅब प्रदर्शनात ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण व उल्लेखनीय सहभाग नोंदविला. हे प्रदर्शन कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपापले नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले होते.
या प्रदर्शनामध्ये ब्रह्मदास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तीन प्रकल्प सादर केले. त्यामध्ये जमिनीतील ओलावा मोजणी प्रकल्प, मोबाईल सेन्सॉर प्रकल्प आणि स्टडी टेबल प्रकल्प यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रकल्पांना उपस्थित शिक्षक, तज्ज्ञ व पाहुण्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः मोबाईल सेन्सॉर प्रकल्प यांचे सर्वांनी कौतुक केले.
या प्रदर्शनात विद्यालयातील शिवण्या राजाराम पावणे, सिद्धी अमोल मोहिते, संचित वाघमारे आणि कुणाल कुंभार या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकता, तांत्रिक ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रकल्प प्रभावीपणे सादर केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
या प्रकल्पांसाठी पी. टी. पाटील, जी. व्ही. रणदिवे आणि व्ही. एस. कामडी या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. बी. माने यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रदर्शनादरम्यान सादर केलेल्या विद्यालयाच्या डिजिटल प्रकल्पांचे परीक्षण डॉ सुप्रिया साळवे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व तांत्रिक कौशल्याचे कौतुक करत भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेल्या या प्रकल्पांमुळे ब्रह्मदास विद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांची झलक पाहायला मिळाली. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि नवोपक्रमाची प्रेरणा वाढत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#BelwadeBK #Karad #Satara


0 टिप्पण्या