🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

‘अविष्कार 2K26’ ने गाजवला मोकाशी कॅम्पस: स्नेहसंमेलन उत्साहात, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

 


विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनत उद्योजक व्हावे - रामकृष्ण वेताळ

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, राजमाची (ता. कराड) अंतर्गत विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अविष्कार 2K26’ या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाने दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला.

या कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, महाराष्ट्र कृषी पर्यटन संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग तावरे, रोमॅक्स पुणेचे कार्यकारी संचालक अविनाश जोगदंड, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, तसेच शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. इंदिरा घनमोडे, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब कदम, कराड मार्केट कमिटीचे माजी सभापती सुनील पाटील आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी व प्राचार्यही उपस्थित होते.

कार्यक्रमात लोकप्रिय टीव्ही कलाकार संतोष पवार यांच्या उपस्थितीने विशेष रंगत आली. नामांकित सूत्रसंचालिका तेजस्विनी शहा यांनी प्रभावी सूत्रसंचालन व प्रश्नमंजुषेद्वारे उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी विविध महाविद्यालयांतील गुणवंत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

एमपीएससी व बँकिंग क्षेत्रात यश मिळवून शासकीय सेवेत दाखल झालेल्या तसेच उद्योजकता आणि आधुनिक शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी अनुभवांचे मार्गदर्शन केले. यामध्ये तेजस गाडेकर, गणेश होळकर, सुजित बर्गे, विशाल टकले आणि अक्षय गेजगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

रामकृष्ण वेताळ यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वावलंबी व्हावे आणि रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनावे, असे आवाहन केले. पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन क्षेत्रातील संधी अधोरेखित करत हे क्षेत्र शेतकऱ्यांसाठी लाभदायक पर्याय ठरू शकते, असे सांगितले आणि कृषी पदवीधरांनी या दिशेने वाटचाल करावी, असेही नमूद केले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तरुणांना व्यसनमुक्त राहून पालक व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशा निवडण्याचा सल्ला दिला. याचवेळी प्रतिष्ठानचे सचिव अभिजित मोकाशी यांच्या कृषी पर्यटन क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात अविनाश जोगदंड, डॉ. इंदिरा घनमोडे, सुनील पाटील आणि विलास चौधरी यांनीही आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य व विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत आणली. प्रा. डॉ. शिंदे व प्रा. सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्यास प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#मोकाशीप्रतिष्ठान #अविष्कार2k26 #KaradNews

#ChangbhalaNews #रामकृष्णवेताळ #SataraNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या