🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कोयना बँकेची दमदार वाटचाल; २०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण !

 


स्थापनेपासून ऑडिटमध्ये 'अ' वर्ग कायम राखत विश्वासार्हता जपली


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

 
लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोयना सहकारी बँक लि., कराड या बँकेने मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरीची नोंद केली आहे. बँकेने २०१.३५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पार करून आपली दमदार वाटचाल सिद्ध केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष कृष्णत पाटील यांनी दिली.

सन १९९६ साली कराड येथे स्थापन झालेल्या या बँकेने सातारा, सांगली आणि पुणे या तीन जिल्ह्यांत आपले जाळे विस्तारले आहे. आज बँकेच्या एकूण १२ शाखा कार्यरत असून, मुख्य कार्यालय स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीत आहे. स्थापनेपासून बँक सातत्याने नफ्यात असून, दरवर्षी बँकेला 'अ' ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे, हे बँकेच्या पारदर्शक कारभाराचे प्रतीक आहे.

मार्च २०२६ अखेर बँकेच्या एकूण ठेवी २०१.३५ कोटी रुपयांवर पोहोचल्या असून, बँकेने १४१.१० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेचा सीडी रेशो ७०.०७ टक्के इतका समाधानकारक आहे. अत्यंत शिस्तबद्ध कारभारामुळे बँकेने १.९५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा आणि ०.९२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. तसेच, बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १५.१२ टक्के असून निव्वळ एनपीए (Net NPA) २.७७ टक्के इतका मर्यादित राखण्यात बँकेला यश आले आहे.

ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी बँकेने (IMPS) मोबाईल बँकिंग आणि यूपीआय (UPI) यांसारख्या आधुनिक सुविधांचा यशस्वी अवलंब केला आहे. आरबीआयच्या सर्व निकषांची पूर्तता करत असतानाच, संचालक मंडळाने निस्वार्थपणे आणि विश्वस्ताच्या भूमिकेतून काम केल्यानेच ही प्रगती साध्य झाल्याचे उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे यांनी नमूद केले.

बँकेच्या या यशाबद्दल बोलताना अध्यक्ष कृष्णत पाटील म्हणाले की, स्व. विलासकाकांच्या विचारांचा वारसा आणि ॲड. उदयसिंह पाटील यांचे मार्गदर्शन यामुळेच बँक प्रगतीपथावर आहे. बँक नेहमीच तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध असून, जास्तीत जास्त सभासद आणि खातेदारांनी बँकेच्या आकर्षक ठेव व कर्ज योजनांचा लाभ घ्यावा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कोयनाबॅंक #चांगभलंन्यूज #उदयसिंहपाटील_उंडाळकर

#रयतसंघटना #कराड #साताराबातम्या #KaradNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या