कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत हायवेवरून पोकलेन ब्रेकर चोरी झालेल्या गुन्ह्याचा कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने छडा लावत परजिल्ह्यातील तिघा आरोपींना अटक केली असून सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात 17 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 10 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मौजे नारायणवाडी, ता. कराड हद्दीत कोल्हापूर-सातारा रोडलगत प्रणव वाईन शॉप समोर उभा केलेला पोकलेन मशीनचा ब्रेकर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला मार्गदर्शन करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, दिनांक 10 एप्रिल 2026 पासून तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चोरीस गेलेला ब्रेकर कोल्हापूर येथे विक्रीसाठी नेला जात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने मालखेड फाटा येथे सापळा रचला.
दरम्यान, संशयित टाटा कंपनीचा छोटा हत्ती (टेम्पो) हा हायवेच्या दिशेने येताना दिसताच पोलिसांनी शिताफीने अडवून ताब्यात घेतला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेला ब्रेकर आढळून आला.
यावेळी पोलिसांनी गाडीत असलेल्या इसमांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे, जगन्नाथ किसन काळे, वय 47 वर्षे, व्यवसाय शेती, रा. गायकवाड गल्ली, राज पिंपरी, ता. जि. बीड, जितेंद्र लक्ष्मण मुळीक, वय 25 वर्षे, व्यवसाय शेती, रा. इदलगाव, मारुती मंदिर रोड, ता. अंबड, जि. जालना, महादेव फलाजी भिसे, वय 35 वर्षे, व्यवसाय उसतोडी मुकादम, रा. सातारा वाहेगाव, ता. परतुर, जि. जालना अशी सांगितली. चौकशीत त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सुमारे ५ लाख रुपये किंमतीचा पोकलेन ब्रेकर तसेच गुन्ह्यात वापरलेला ४ लाख रुपये किंमतीचा टाटा एसीई प्लस छोटा हत्ती टेम्पो मिळून एकूण ९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे, हवालदार सचिन निकम, किरण बामणे, प्रफुल्ल गाडे, दीपक देशमुख तसेच पोलीस पाटील नारायणवाडी यांच्या पथकाने केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#CrimeNews #KaradCrimeNews #SataraPolice
#NH48 #KaradNews #ChangbhalaNews
#चांगभलंन्यूज #कराडग्रामीणपोलीस

0 टिप्पण्या