कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज बापूसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीत संघटन विस्तार, आगामी राजकीय रणनीती आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर सखोल चर्चा झाली. या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीने संघटनात्मक फेरबदल सुचवत देवदास दत्तात्रय माने यांची युवक काँग्रेसच्या कराड तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर करत तालुक्यातील युवकांची कमान हाती दिली. प्रदेशाध्यक्ष शिवराज बापूसाहेब मोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या बैठकीस अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तारीक बागवान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहप्रभारी शांभवी शुक्ला, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबणावे, सातारा जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी व प्रदेश सरचिटणीस भूषण रानभरे, सातारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुलराज पवार, प्रदेश सरचिटणीस प्राची ताकतोडे, अमित जाधव, प्रदेश सचिव सौरभ रुपणवार, विश्वजित जाधव, पंकज पोळ यांच्यासह सर्व जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, सचिव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वासाची जबाबदारी; संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार...
या बैठकीत सातारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुलराज पवार यांनी देवदास माने यांच्या कार्यकुशल नेतृत्वगुणांची, संघटन क्षमतेची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत त्यांची नियुक्ती जाहीर केली.
या नियुक्तीमुळे कराड तालुक्यात युवक काँग्रेस संघटनेला अधिक बळकटी मिळेल आणि पक्षाची धोरणे प्रभावीपणे तळागाळात पोहोचविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तळागाळातून घडलेले नेतृत्व : देवदास माने...
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या मालखेड या छोट्या खेडेगावचे सुपुत्र असलेले देवदास माने हे गेली २० वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात एकनिष्ठपणे कार्यरत आहेत.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधूनच करत त्यांनी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष, सातारा जिल्हा सरचिटणीस अशी विविध पदे सांभाळली आहेत.
इंधन दरवाढ, गॅस टंचाई, शेतकरी कर्जमाफी यांसारख्या जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी सक्रियपणे आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे आणि स्थानिक सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देत त्यांनी तळागाळात आपली ओळख निर्माण केली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा; युवकांची फळी मजबूत होण्याची शक्यता....
देवदास माने यांच्या निवडीमुळे कराड तालुक्यात युवक काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, युवकांची मोठी फळी पक्षासोबत उभी राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आत्तापासूनच रंगू लागली आहे.
युवकांचे संघटन मजबूत करणार....
“ही संधी कामाची पोहोच पावती; युवकांचे प्रश्न सोडवून पक्ष अधिक मजबूत करणार!”
-- देवदास माने,
नवनियुक्त कराड तालुकाध्यक्ष,
राष्ट्रीय युवक काँग्रेस पक्ष.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #SataraCongress #DevdasMane
#ChangbhalaNews #ChangbhalaWeekly
#चांगभलं #चांगभलंन्यूज #कराड #काँग्रेस #युवककाँग्रेस

0 टिप्पण्या