🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड दक्षिण काँग्रेस व वारुंजी जिल्हा परिषद गटाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 


कराड, प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्यावतीने व वारुंजी जिल्हा परिषद गटाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी आणि वारुंजी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. सुनंदा नामदेव पाटील यांनी वारूंजी जिल्हा परिषद गटाच्यावतीने जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते इंद्रजित चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस प्रदीप जाधव, कराड पंचायत समितीचे सदस्य रवींद्र बडेकर, माजी उपसरपंच बाळासाहेब चव्हाण (वारुंजी), माजी उपसरपंच भिमराव जमाले (मुंढे), शिवाजीराव जमाले (मुंढे) तसेच अमृत पवार (खोडशी) आदी मान्यवर उपस्थित होते.


सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #ChangbhalaNews #Karad

#चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या