समता, न्याय व बंधुतेचा संदेश देत समाजपरिवर्तनाचा संकल्प दृढ
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
बेलवडे बुद्रुक येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे गणेश व नवरात्र मंडळाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या कार्याला व विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी संविधानातील मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देत समता, न्याय आणि बंधुतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून समा
जाला प्रगतीचा मार्ग मिळतो, तसेच त्यांच्या प्रेरणेने सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्याचा संकल्प अधिक दृढ झाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमास भास्करराव तडाके, संजय तडाके, दिलीप सकटे, दादासाहेब तडाके, सचिन तडाके, शुभम बाबर, प्रवीण भोसले, राजू तडाके, भास्कर फ. तडाके तसेच मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत तडाके सर यांनी केले.
तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. खांडके, पोलीस पाटील सौ. भारती कुंभार, जयवंतदादा मोहिते, मारुती मोहिते, मारुती उर्फ बलू पाटील, उमेश मोहिते (नाना), प्रशांतदादा मोहिते, विलास मोहिते (नाना), विजय मोहिते, देवराज मोहिते, निलेश तडाके व परिसरातील समाजबांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 टिप्पण्या