🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कर्तॄत्ववान व्यक्तिमत्त्वांचा वारुंजीत सन्मान; डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


वारुंजी (ता. कराड) येथे १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्थानिक मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील कर्तृत्ववान मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.


कार्यक्रमात कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव तसेच नगरसेवक नरेंद्र लिबे यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत करून अनेक जणांचे प्राण वाचवणाऱ्या डीपी जैन पीआरओ ऑफिसर दस्तगीर आगा यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


या प्रसंगी मंडळाचे गजानन सकट, रामभाऊ सातपुते, अमोल भिसे, जितेंद्र भोसले, योगेश पवार, रवी भोसले यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत कार्यक्रमात सामाजिक एकात्मता आणि संविधान मूल्यांचा संदेश देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या