कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
रेठरे खुर्द (ता. कराड) येथील कु. साक्षी मारुती लोहार तसेच रेठरे बुद्रुक येथील सौरभ नावडकर यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई मोहिते यांच्या हस्ते दोघांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ. अर्चनाताई मोहिते यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर मोठे यश कसे मिळवावे, याचे उत्तम उदाहरण साक्षी लोहार हिने घालून दिले आहे. तिच्या यशामागे आई-वडील, गुरूजनांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत आहे.
तसेच सौरभ नावडकर यानेही पोलीस भरतीच्या खडतर प्रक्रियेतून मार्ग काढत सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर यश मिळवले असून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. दोघांची पोलीस दलातील निवड हा परिसरासाठी अभिमानाचा विषय असल्याचे सौ. मोहिते यांनी नमूद केले.
या सत्कार प्रसंगी मारुती लोहार, अरुण साळुंखे, किरण कदम, शिवाजी नावडकर, नितीन लाड आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या