🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

प्रवीण काकडे यांना ‘महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रदान; सामाजिक-शैक्षणिक कार्याची राज्यस्तरीय दखल

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कराडच्या धोंडेवाडी येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांना आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन यांच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात अमरजीत राजे जाहगीरदार (तळोदा संस्थान, नंदुरबार) यांच्या हस्ते प्रवीण काकडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरू, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ), रामराव वडकुते (खासदार), गोपीचंद पडळकर (आमदार), राहुल आहेर (आमदार), डॉ. अभिमन्यू टकले (संस्थापक अध्यक्ष, आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन), बाळासाहेब कर्णवर पाटील (चेअरमन, श्रीश्री सदगुरु सहकारी साखर कारखाना), सोमनाथ कर्णवर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, ठाणे), विजयराव हाके, डॉ. नरेंद्र बागुल, मधुकर सलगरे (प्राचार्य, लातूर), दिपक राहीज (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, युवक आघाडी), संपतराव शेंडगे (राज्य उपाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), प्रा. शीतल काकडे, नागु वीरकर (हेडाम कादंबरी), शेखर कुंवर (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), बन्सीलाल भागवत (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, फादर बॉडी, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), प्रा. बाळासाहेब माने, भास्करराव जाधव (राज्य उपाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), प्रा. गणेश हजारे, बापूसाहेब शिंदे, शिवाजीराव ढेपले, संभाजीराव सुळ आणि सचिन सागोरे (जिल्हाध्यक्ष, जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.



शैक्षणिक चळवळीत मोलाचा वाटा...

प्रवीण काकडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी सुमारे ५००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असून, शिक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.

दुर्गम भागात सामाजिक कार्याचा ठसा....

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांतील डोंगर-दऱ्या व दुर्गम भागांमध्ये त्यांनी महिलांसाठी साडी वाटप, सॅनिटरी पॅड वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे. नोकरी सांभाळत त्यांनी हे कार्य सातत्याने पुढे नेले आहे.

महिला सन्मान व शिक्षण क्षेत्रातील उपक्रम....

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांनी महाराष्ट्रातील विविध शहरांत महिला सन्मान सोहळे आयोजित केले. कराड येथे १४५, पुणे येथे ९०, तर मुंबई येथे १४२ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
तसेच कराड येथे एकाच वेळी २४५ विद्यार्थ्यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करत शैक्षणिक चळवळीला बळकटी दिली.

कार्याची राज्यस्तरीय दखल...

प्रवीण काकडे यांच्या कार्यामुळे समाजातील वंचित घटकांना नवे बळ मिळाले असून, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभा केलेला आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने कराडसह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान , पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रवीण काकडे यांचे अभिनंदन केले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#PravinKakade #SataraNews #KaradNews

#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

#धनगरमहासंघ #आदिवासीधनगरसाहित्यसंमेलन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या