🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

ऊस वाहतूकदारांचे यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी आंदोलन; फसवणूक प्रकरणी कठोर कायद्याची मागणी

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
ऊस वाहतूक ट्रक-ट्रॅक्टर मालक संघटना समन्वय कृती समितीच्यावतीने सोमवारी येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात , स्वर्गीय चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व ऊस तोडणी वाहतूक कृती समितीचे प्रणेते व जनआंदोलक पृथ्वीराज संभाजी पवार (भैया) यांनी केले.
यावेळी प्रमोद जगदाळे, तुकाराम डुबल, प्रशांत रूपनवर, नजीर बागवान, शिवाजीराव भोसले, सुभाष साळुंके, गजानन भगत, सत्यजित सल्ले, अजित हेरवाडे, संदीप राजोबा, सुधीर शिंदे, कांतीलाल नाईकनवरे, रामेश्वर नागरगोजे आदी उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान बोलताना स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी, राज्यातील विविध संघटना एकत्र येऊन फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर तात्काळ कारवाई करून बुडालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली. वाहतूकदारांनी मुलाबाळांच्या तोंडाचा घास बाजूला ठेवून लाखो रुपये दिले असून, गेली तीन वर्षे न्यायासाठी लढा सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रशांत रूपनवर यांनी सर्व ऊस वाहतूकदारांना संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन करत, शासनाने तयार करत असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संघटित ताकद आवश्यक असल्याचे सांगितले. हजारो कोटींची फसवणूक होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


पृथ्वीराज पवार यांनी राज्यभरातील संघटनांनी एकत्र येऊन लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी फास्टट्रॅक न्यायालय, जामिनासाठी ५० टक्के रक्कम भरण्याची सक्ती आणि संघटित गुन्ह्याची तरतूद अशा प्रमुख मागण्या राज्यसरकारकडे केल्या. येत्या २०२६-२७ च्या हंगामापूर्वी हा कायदा लागू करण्याचीही मागणी त्यांनी केली. दरम्यान, ऊस वाहतूकदारांच्या मागण्याबाबत आत्तापर्यंत सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख करत, शासनाने तातडीने पुढचे ठोस निर्णय घेऊन ऊस वाहतूकदारांना न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#ऊसवाहतूकदार #कराडआंदोलन #KaradNews

#ऊसवाहतूकसंघटना #PrithvirajPawar #Karad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या