🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

महाराष्ट्रात ‘फुले उत्सव समिती’च्या माध्यमातून काँग्रेसची संघटन मोहीम वेगात; पुण्यात नियोजन बैठक उत्साहात

 


साताऱ्यातील 'या' नेत्याची समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

सातारा | चांगभलं वृत्तसेवा

देशभरात काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विविध नव्या समित्यांची स्थापना सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी पक्षाचे सरचिटणीस व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र भानुदास माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार जनसामान्यांपर्यंत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त पुणे येथे आयोजित नियोजन बैठकीने झाली. ही बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भानुदास माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.


या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी, “उत्सव समितीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील, त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहणार असून या समितीला माझा संपूर्ण पाठिंबा राहील,” असे स्पष्ट केले.
समितीचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वर्षभरात राज्यभर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबवून शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार केला जाईल. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरणे आणि उद्दिष्टे जनतेसमोर मांडून सामाजिक व राजकीय जागृती करत संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल. तसेच, ११ एप्रिल २०२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कडगून येथे समितीच्या उपक्रमांचा समारोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अशोक गेहलोत तसेच काँग्रेसमधील वरिष्ठ व ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.


या बैठकीला माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्तीताई चौधरी, पुणे शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे, नगरसेवक साहिल केदारी, प्रशांत जगताप, दरेकर यांच्यासह पुणे महापालिकेचे इतर नगरसेवक उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद सदस्या विमलताई कटरे, जे. पी. पाटील, प्रवीण जांबळे, राजीव घुटे, कांचन चाटे, अशोक खलाणे, तुषार पेंढारकर, सोमनाथ शेळके, विश्वपंथ नेवाळे, भरत वालेकर, संभाजी जाधव, आढाव, डॉ. मेघनाताई वैरागडे, ज्योतीताई परदेशी, गणेश राऊत, सुनील पंडित, धनराज राठोड, शंभो म्हात्रे, शैलेश राऊत, बाळाराम वसकर, प्रवीण आचरेकर, विश्वनाथ जगताप, मोहन अडसूळ, रोहित बनकर व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले जयंतीनिमित्त १० हजार किलो मिसळ पाव वाटप केल्याबद्दल बाळासाहेब अमराळे यांचा हर्षवर्धन सपकाळ व भानुदास माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बारामती येथील इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची नोंदही यावेळी घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन पुणे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप परदेशी, कुमार राठोड, जीवन चाकणकर, बाळासाहेब विभुते, प्रणव परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस भवन येथे केले.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #ChangbhalaNews #Pune

#CongressNews #BhanudasMali 

#चांगभलंन्यूज #महात्माफुलेजयंती




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या