🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सामाजिक कार्याची दखल; शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सातारा जिल्हाप्रमुखपदी शंभूराज मदने यांची नियुक्ती

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड
कराड तालुक्यातील युवा नेतृत्व श्री. शंभूराज (संभाजी) मदने यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सातारा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे‌.

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख अनिल मोरे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ. श्री. संतोषकुमार बामणे, कराड दक्षिण तालुकाप्रमुख सौ.विजयाताई घाडगे, कराड उत्तर तालुकाप्रमुख सौ.वैशालीताई वाघमारे यांच्या उपस्थितीत श्री‌. मदने यांना पक्षाकडून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

शंभूराज मदने हे मूळचे कराड तालुक्यातील डोंगराळ भागातील कामथी गावचे सुपुत्र असून सध्या त्यांचे कुटुंब कराड नजीकच्या बनवडी येथे स्थायिक आहे. त्यांच्या कुटुंबाला धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभला असून सामाजिक कार्यात संपूर्ण कुटुंब नेहमीच अग्रभागी राहिले आहे. शंभूराज मदने यांनी कामथी येथे गेल्या अनेक वर्षापासून गोशाळा यशस्वीपणे चालवली असून गोशाळेत जन्माला येणारे 'बैल' हे भागातील शेतकऱ्यांना सांभाळ करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या पुढाकारातून कामथी येथे दरवर्षी श्री दत्त जयंती उत्सव हा धार्मिक सोहळा साजरा करण्यात येतो. त्यांनी आजवर विविध आरोग्य शिबिरे यशस्वीपणे राबवली आहेत. त्याचा गरजूंना लाभ झाला आहे. तसेच आरोग्य समस्या असलेल्या गरजूंना विविध सेवाभावी संस्थांकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आहेत. सामाजिक दृष्टिकोन ठेवून कार्यरत असलेल्या शंभूराज मदने यांच्या या कार्याची दखल शिवसेना पक्षाने घेतली घेतली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे, कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सातारा जिल्हा प्रमुख पदाची धुरा श्री. मदने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मान्यवरांकडून अभिनंदन....!!!

दरम्यान, शंभूराज मदने यांच्या या निवडीबद्दल शिवसेना नेते खा. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार (माऊली), जिल्हा समन्वयक व कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, हिंदकेसरी संतोषआबा वेताळ, शिवसेनेचे कराड शहर प्रमुख राजेंद्र माने, महिला आघाडी उपाध्यक्षा सुलोचनाताई पवार, कराडचे नगरसेवक नरेंद्र लिबे, माथाडी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय सोनुलकर, युवा कार्यकर्ते रुपेश मुळे, अखिल भारतीय बेडर, बेडर रामोशी कृती समितीचे राज्याध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, एम एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव मदने, स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांचे वंशज आबासो जाधव, जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादा मंडले, महाराजा प्रतिष्ठानचे अमोल मदने, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, आद्यक्रांतिवीर उमाजी-बहिर्जी नाईक समाज सुधारक संघटनेचे दादाराम जाधव, रंगराव मदने, कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय जाधव, सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, सुनिल जाधव, मल्हारी गुजले, अमोल यलमारे, प्रशांत चव्हाण, अमोल चव्हाण, पुष्पक चव्हाण, सोमनाथ पाटोळे (उंब्रज), पाटणचे दीपक भंडलकर, यांच्यासह विविध गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सदस्य व कामथी आणि बनवडी विभागातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.




शिवसेनेचा सेवाभाव जिल्हाभरात पोहोचविणार.... वैद्यकीय उपक्रम राबवणार - शंभूराज मदने



"शिवसेना पक्ष हा राजकीय क्षेत्रात कार्यरत असला तरी पक्षाचे सामाजिक पातळीवर मोठे योगदान आहे. शिवसेनेने आजवर गरजूंना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे काम केले आहे. वेगवेगळ्या आपत्ती काळात शिवसेनेचे हे भरीव योगदान अधोरेखित झालेले आहे. हाच पक्षाचा सेवाभाव वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जिल्हाभरात पोहोचवून जिल्ह्यात वैद्यकीय मदत आवश्यक असलेल्या गरजूंना हवी ती सर्व मदत मिळवून देणार आहे. या कामी पक्षातील वरिष्ठांचे जेथे आवश्यक असेल तेथे सहकार्य घेऊन लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. जिल्हाभरातील वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आरोग्य विषयक उपक्रम सातत्याने राबविण्यावर माझा भर राहील."
--- शंभूराज (संभाजी) मदने,
सातारा जिल्हाप्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कराड #शंभूराजमदने #शिवसेनावैद्यकीयमदतकक्ष

#साताराजिल्हा #शिवसेना #उपमुख्यमंत्रीएकनाथशिंदे

#शंभूराजदेसाई #चांगभलंन्यूज #चांगभलं 

#ChangbhalaNews #मराठीबातम्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या