🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कोयना बँकेचे चेअरमन कृष्णत (के. टी.) पाटील यांना 'आईसाहेब फाउंडेशन'चा गौरव पुरस्कार

 


कृषी, सहकार आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल नांदगाव येथे सन्मान

चांगभलं प्रतिनिधी | कराड

येथील अग्रगण्य कोयना सहकारी बँक लि. चे चेअरमन, प्रगतशील शेतकरी व नामवंत उद्योजक कृष्णत तथा के. टी. पाटील यांना 'आईसाहेब फाउंडेशन'तर्फे या वर्षीचा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषी, सहकार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि बहुआयामी प्रगतीबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

नांदगाव (ता. कराड) येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) चौधरी आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संजय कुंभार यांच्या शुभहस्ते के. टी. पाटील यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर 'आईसाहेब शालन शेडगे फाउंडेशन'चे विश्वस्त शेडगे, संजय होगले, ॲड. पंडित हरदास आदी मान्यवर उपस्थित होते.

के. टी. पाटील यांनी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आदर्श प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. तसेच, कोयना सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कौशल्याने बँकेला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. त्यांच्या या चौफेर कामगिरीची दखल घेऊनच हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराला उत्तर देताना के. टी. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, "हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून, शेतकरी बांधव आणि सहकार क्षेत्रातील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या कष्टाचा हा सन्मान आहे. या प्रेमामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मला मिळाली आहे."

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KoynaBank #KTPatil #Karad

#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज 

#चांगभलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या