🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी तीन दिवसात सव्वाशे अर्जांची विक्री ; तिसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही

 


उद्या सकाळी संस्थापक पॅनेलचे उमेदवार अर्ज दाखल करणार

हैबत आडके | चांगभलं, कराड

सातारा व सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शिवनगर (रेठरे बुद्रुक ) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी बुधवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र तिसऱ्या दिवसा अखेर १२५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. दरम्यान, कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांचे अर्ज उद्या (गुरुवारी) सकाळी निवडणूक कार्यालयात दाखल केले जाणार आहेत.

कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार उपनिबंधक अपर्णा यादव यांनी बुधवारी (दि. २०) मे रोजी ४३ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याचे आणि बुधवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या तीन दिवसात तब्बल १२५ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत गट क्रमांक २ काले-कार्वे आणि गट क्रमांक ४ रेठरे हरणाक्ष-बोरगाव या मतदारसंघांतून प्रत्येकी एक अर्ज तर गट क्रमांक ६ रेठरे बुद्रुक-शेणोली मतदारसंघातून दोन उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केली असल्याने दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या ४ झाली आहे. अर्ज मात्र भरमसाठ विक्री झाले असल्याने इच्छुकांची संख्या ही खूपच असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. २२ मे) दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी इच्छुक उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पोलिसांना घ्यावी लागणार आहे.


संस्थापक पॅनेल उद्या अर्ज दाखल करणार...

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलकडून आत्तापर्यंत एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी सकाळी अन्य सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. माजी चेअरमन अविनाश मोहिते रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानापासून सुरुवात करून पॅनलचे सर्व इच्छुक उमेदवार आणि समर्थक व कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात पोहोचणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कृष्णासाखरकारखानानिवडणूक२०२६ #Krishnasugar

#कृष्णाकारखाना #रेठरेबुद्रुक #सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल

#निवडणूक #कराड #वाळवा #कडेगाव #ईश्वरपूर #कासेगाव 

#चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं #चांगभलं 

#ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या