🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

९१ टक्के मतदान, गावागावात चुरस अन् सत्तेसाठी प्रतिष्ठेची लढाई; २०२१ च्या ‘कृष्णा कारखानाच्या’ ऐतिहासिक रणधुमाळीचा फ्लॅशबॅक

 ‘कृष्णा’चा सत्ता संघर्ष - भाग १





हैबत आडके | चांगभलं, कराड

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पुन्हा एकदा कराड, वाळवा आणि परिसरातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. २०२६ च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, २२ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ९ जूनपर्यंत माघार प्रक्रिया पार पडणार असून २१ जूनला मतदान आणि २३ जूनला मतमोजणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर “चांगभलं” वृत्तपत्राकडून सुरू करण्यात आलेल्या ‘कृष्णा’चा सत्ता संघर्ष या विशेष वृत्तलेखमालेच्या पहिल्या भागात आपण २०२१ मधील निवडणुकीचा राजकीय मागोवा घेत आहोत.

२०२१ मध्ये रंगला होता तिरंगी सामना...
सन २०२१ मधील कृष्णा कारखान्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. त्यावेळी तीन प्रमुख पॅनेल मैदानात उतरले होते.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेल × कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल × रयत पॅनेल...
या तिरंगी लढतीमुळे संपूर्ण कार्यक्षेत्रात प्रचंड राजकीय चुरस निर्माण झाली होती. गावागावांत सभा, मेळावे, घरभेटी, मतदार संपर्क यामुळे निवडणूक वातावरण अक्षरशः तापले होते.
मात्र २०२६ मध्ये चित्र बदलले आहे. यावेळी मुख्य लढत थेट दोन दिग्गज गटांमध्ये होताना दिसत आहे.
एकीकडे डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, तर दुसरीकडे अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल अशी थेट द्वंद्वयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
रयत पॅनेलची चर्चा सध्या तरी राजकीय वर्तुळात दिसून येत नाही.

१४८ केंद्रांवर विक्रमी मतदान...
२०२१ मधील निवडणुकीत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील तब्बल १४८ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते.
एकूण ४७ हजार १४५ मतदारांपैकी ३४ हजार ५३२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अधिकृत आकडेवारीनुसार मतदानाची टक्केवारी ७३.२५ इतकी नोंदवली गेली.
मात्र या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास ९ हजार सभासद मयत असल्याची नोंद होती. कोरोना महामारीनंतर अनेक सभासदांचे निधन झाले होते. त्यामुळे प्रत्यक्ष हयात सभासदांचा विचार केला असता मतदानाची टक्केवारी तब्बल ९१ टक्क्यांवर पोहोचली होती.
ही आकडेवारी कृष्णा कारखान्याच्या सभासदांमध्ये असलेली राजकीय जागरूकता आणि कारखान्याच्या सत्तासंघर्षाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली होती.

मतदानाच्या आकड्यांमधून दिसलेले राजकीय गणित
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्येक गावातील मतदानाची टक्केवारी राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. कोळे, उंडाळे, काले, रेठरे बुद्रूक, कार्वे, वाठार, इस्लामपूर, बोरगाव, देवराष्ट्र, तांबवे, कासेगाव या भागांत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते.
विशेष म्हणजे काही केंद्रांवर ८० टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे कोणत्या गावात कोणत्या पॅनेलची ताकद आहे, याचे संकेत त्यावेळीच मिळू लागले होते.

प्रत्यक्षात गावनिहाय झालेल्या मतदानाचा तपशील असा होता....

गाव व मतदान केंद्र क्रमांक, कंसात एकूण मतदान, व कंसाच्या पुढे प्रत्यक्षात झालेले मतदान असे होते : कोळे - १ (२१६) १३५, कोळे २ (२२५) १६९, कोळे-३ (३१८) २२४, कोळेवाडी (३५१) २६७, येणके (३६६) २५९, पोतले-६ (३१४) २१७, पोतले-७ (३२७) २२०, येरवळे-८ (२१६) १६५, येरवळे-९ (२२५) १६५, विंग -१० (३७८) २८८, विंग-११ (३७१) २६१, वारुंजी (१८३) १३०, पार्ले (२६८) १८३, टेंभू-१४ (३३८) २३९, टेंभू-१५ (३१७) २३८, सदाशिवगड -१६ (३५१) २५३, सदाशिवगड- १७(३६४) २५५, कोरेगाव (३७६) २८८, वडगाव हवेली- १९ (३२४) २३८, वडगाव हवेली-२० (३२४) २४७, वडगाव हवेली-२१ (३२४) २५८, वडगाव हवेली-२२ (३४२) २५८, कोडोली-२३ (२७०) २०५, कोडोली- २४ (२७०), २०४, कोडोली - २५ (२८८) २२५, दुशेरे -२६ (३२४) २५६, दुशेरे-२७ (३००) २२४, तडसर (४३२) २५९, उंडाळे-२९ (३०३) २३२, उंडाळे-३० (२७४) २०७, सवादे-३१ (३३९) २५०, सवादे-३२ (३३७) २५६, ओंड-३३ (२८३) २१४, ओंड-३४ (२६०) १९१, ओंड-३५ (२७९) २२६, काले-३६ (३२४) २२८, काले-३७ (३२४) २१५, काले-३८ (३२४) २३९, काले-३९ (३२४) २६६, काले-४० (२७४) २१८, धोंडेवाडी (३८४) २७९, नारायणवाडी (३४०) २३५, आटके-४३ (३२४) २४४, आटके- ४४ (३२४) २३६, आटके-४५
(३२४) २६०, आटके-४६ (२८०) २०६, जखिणवाडी-४७ (३२३) २५६, जखिणवाडी-४८ (३३२) २६०, कापिल-४९ (३२४) २३२, कापिल-५० (३४९) २६३, कापिल- ५१ (३२६) २५०, कार्वे-५२ (३७८) २९३, कार्वे-५३ (३७८) २७३, कार्वे-५४ (३७८) २७२, कार्वे-५५ (३५८) २७९, तांबवे-५६ (३५१) २४४, तांबवे-५७(३५१) २५३, तांबवे-५८ (३५१) २६५, तांबवे-५९ (३२४) २३२, पेठ-६० (२९७) १९७, पेठ-६१ (३१७) २१४, नेर्ले-६२ (२९७) २२६, नेर्ले-६३ (२९७) २१०, नेर्ले-६४ (२९७) २१९, नेर्ले-६५ (३२४) २३९, नेर्ले-६६ (३२०) २०१, काळमवाडी-६७ (२७९) २२३, काळमवाडी-६८ (२९३) २१२, कासेगाव-६९ (३५१) २५५, कासेगाव-७० (३४३) २४८, वाटेगाव-७१ (३३९) २५१, वाटेगाव-७२ (३४४) २५१, कापूसखेड (२८९) २०७, कासारशिरंबे-७४ (३२४) २४१, कासारशिरंबे-७५ (२८५) २२८, साळशिरंबे (१९२) १५०. बेलवडे बुद्रूक-७७ (२९७) २४०, बेलवडे बुद्रूक-७८ (२८८) २२२, वाठार-७९ (३७८) २८९, वाठार-८० (३५५) २८७, कालवडे-८१ (३२४) २३३, कालवडे-८२ (३१६) २४३, कामेरी-८३ (२९७) २१०, कामेरी-८४ - (२७०) २१९, कामेरी-८५ (२८७) २१०, इस्लामपूर-८६ (३७८) २६७, इस्लामपूर-८७ (३७५) २७४, साखराळे-८८ (२१६) १६२, साखराळे-८९ (२०३)१५९, बोरगाव-९० (३७८) २७७, बोरगाव-९१ (३५१) २७४, बोरगाव-९२ (३४६) २६९, बोरगाव-९३ (३४८) २७२, ताकारी (४०४) २६१, बहे-९५ (२९७)२०८, बहे-९६ (२९७) २३५, बहे-९७ (२९३) २०६, हुबालवाडी (३३४) २५२, रेठरे धरण (३४४) २६६, महादेवनगर (३६७) २७६, रेठरे हरणाक्ष-१०१ (३७८) २७१, रेठरे हरणाक्ष-१०२ (३९८) २७९, रेठरे हरणाक्ष-१०३ (३७२) २६७, बिचुद-१०४ (२७०) १६८, बिचुद-१०५ (२९०) २०१, शिरटे-१०६ (३२४) २६६, शिरटे-१०७ (३३२) २४०, येडेमच्छिंद्र-१०८ (३२४) २१८, येडेमच्छिंद्र-१०९ (३२४) २४८, येडेमच्छिंद्र-११० (३४३) २५०, किल्ले मच्छिंद्रगड-१११ (२९७) २०९, कि. मच्छिंद्रगड- ११२ (२९७) २३२, कि. मच्छिंद्रगड-११३ (२५८) १८१, नरसिंहपूर-११४ (३२४) १९७, नरसिंहपूर-११५ (३२५.) २१२, मोहिते वडगाव-११६ (२५८) १८७, मोहिते वडगाव-११७ (३६३) २३८, हिंगणगाव (१७२) १२४, चिंचणी (अं) (३६४) २३२, देवराष्ट्र-१२० (३९१) २८०, देवराष्ट्र-१२१ (३७०) २८६, वांगी (४०७) २४१, भाळवणी (३९१) २६१, रामापूर (४०१) २३०, मालखेड (३४२) २६३, रेठरे खुर्द-१२६ (२९७) २२७, रेठरे खुर्द-१२७ (२९७) २१४, रेठरे खुर्द-१२८ (२६८) २०४, रेठरे खुर्द-१२९ (३२४) २३६, रेठरे बुद्रूक- १३० (३२४) २६०, रेठरे बु.-१३१ (३२४) २३४, रेठरे बु. १३२ (३२४) २६१, रेठरे बु. १३३ (३२४) २३३, रेठरे बु. १३४ (३२४)२५१, रेठरे बु. १३५ (३२४) २६०, रेठरे बु. १३६ (३२४) २६२, रेठरे बु. १३७ (२३३) १८२, खुबी (३७७) २९१, गोंदी-१३९ (२९७) २१३, गोंदी १४० (२९२) २२५, शेणोली-१४१ (२९७) २११, शेणोली १४२ (२९७) २२५, शेरे-१४४ (२९७)२१०, शेरे-१४५ (२९७) २२४, शेरे १४६ (२९७) २२२, शेरे-१४७ (२९१) १९९, सोनकिरे-१४८ (३५६) २१३.


यंदा थेट ‘भोसले विरुद्ध मोहिते’ संघर्ष...

२०२६ च्या निवडणुकीत मात्र परिस्थिती आणखी चुरशीची बनली आहे. तिरंगी लढतीऐवजी आता थेट दोन गट समोरासमोर उभे ठाकले आहेत. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल सत्तेचा गड कायम राखण्यासाठी मैदानात उतरले आहे, तर कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल कारखान्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी रणनीती आखत आहे.
सभासदांच्या भेटीगाठी, गावनिहाय बैठका, पॅनेल बांधणी आणि उमेदवारीच्या हालचालींमुळे कृष्णा कारखान्याचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे.
( क्रमशः)



पुढील भागात...
‘कृष्णा’चा सत्ता संघर्ष - भाग २ मध्ये पाहूया :
➡️ सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने असा साकारला होता विजय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#Krishnasugarfactoryelection #कृष्णाकारखाना

#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल

#डाॅसुरेशभोसले #अविनाशमोहिते #आमदारडाॅअतुलबाबाभोसले

#सौअर्चनाताईअविनाशमोहिते #रेठरेबुद्रुक #शिवनगर #कराड 

#वाळवा #कडेगाव #चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं

#चांगभलं #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या