🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने २०२१ ला असा साकारला होता विजय!

 


'कृष्णा'चा सत्ता संघर्ष - भाग २ (मागोवा)

हैबत आडके | चांगभलं, कराड

रेठरे बुद्रुकच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२१ च्या पंचवार्षिक निवडणुकीने केवळ संचालक मंडळ ठरवले नव्हते, तर सहकाराच्या राजकारणात नेतृत्व कोणाचे टिकणार आणि सभासदांचा विश्वास कोणावर कायम आहे, याचाही फैसला केला होता.
ती निवडणूक होती सत्ता, प्रतिष्ठा आणि वारशाची...
एका बाजूला मोहिते घराण्याचे दोन गट, तर दुसऱ्या बाजूला शांत, संयमी पण संघटनशक्तीवर विश्वास ठेवणारे डॉ. सुरेश भोसले!
आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यात, राजकीय ताकदीच्या आखाड्यात आणि मोठमोठ्या जाहीर सभांच्या गदारोळात अखेर सभासदांनी मतपेटीतून दिलेला निकाल मात्र एकतर्फी ठरला होता.
‘कपबशी’ चिन्हावर लढणाऱ्या सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने तब्बल १० ते ११ हजारांच्या विक्रमी मताधिक्क्याने विरोधकांना धूळ चारत कारखान्यावरील सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात कायम ठेवली होती.
मोहितेंविरुद्ध मोहिते; फायदा भोसलेंना...
त्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला होता तो म्हणजे मोहिते-मोहितेंच्यामधील सवता सुभा!
माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे ‘संस्थापक पॅनेल’ तर डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या नेतृत्वाखालील ‘रयत पॅनेल’ स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते.
त्यांच्या माध्यमातून विरोधकांची मते विभागली जात असताना डॉ. सुरेश भोसले यांनी मात्र संपूर्ण निवडणुकीत एकसंध संघटना आणि नियोजनबद्ध प्रचार यावर भर दिला होता.
गावागावातील कार्यकर्त्यांची मोट बांधत “काम केलेय म्हणून मतं मागतोय” ही भूमिका सहकार पॅनेलकडून सातत्याने मांडली गेली.
सभासदांच्या मनात विकासाचा मुद्दा...
२०१५ ते २०२१ या सत्ता काळात कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांच्या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय, आर्थिक शिस्तीवर दिलेला भर, ऊस उत्पादकांचा मिळवलेला विश्वास आणि कारखान्याच्या सक्षमतेसाठी केलेले प्रयत्न याचा त्यावेळी प्रचारात मोठा प्रभाव दिसून आला होता.
त्यावेळी सभासदांना भावनिक भाषणांपेक्षा कारखान्याची स्थिरता महत्त्वाची वाटली आणि त्याचा थेट फायदा भोसलेंच्या सहकार पॅनेलला झाला, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गावोगावी एकच चर्चा ऐकू येत होती की “वाद नको... कारखाना चालणं महत्त्वाचं!”
मोठ्या नेत्यांची एन्ट्री; पण निकाल मात्र स्पष्ट...
२०२१ च्या या निवडणुकीत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय दिग्गजांनी उघड-उघड भूमिका घेतली होती.
रयत पॅनेलसाठी सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम थेट मैदानात उतरले होते. संस्थापक पॅनेलला माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा पाठिंबा होता.
तर सहकार पॅनेलच्या प्रचारात वाळव्याचे महाडीक बंधू आणि कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सक्रिय झाले होते.
मोठमोठ्या जाहीर सभा, शक्तिप्रदर्शन, प्रचार फेऱ्या, कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे निवडणूक चुरशीची होणार, अशी हवा निर्माण झाली होती खरी,
पण मतमोजणीला सुरुवात होताच एकतर्फी चित्र स्पष्ट होऊ लागले.
पहिल्याच फेरीत कल स्पष्ट!
मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत सहकार पॅनेलने तब्बल साडेपाच हजारांची आघाडी घेत विरोधकांना धक्का दिला होता.
दुसऱ्या फेरीत ही आघाडी आणखी वाढत गेली आणि रात्री उशिरा अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा संपूर्ण कारखाना कार्यक्षेत्रात एकच चर्चा झाली —
“सभासदांनी पुन्हा कपबशीलाच पसंती दिली!”
सर्व २१ जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले होते.
कारखान्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा राजकीय विजय मानला गेला.
भोसलेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब...
या निकालाने केवळ संचालक मंडळच निवडले गेले नाही, तर डॉ. सुरेश भोसलेंच्या नेतृत्वावर सभासदांनी निर्विवाद शिक्कामोर्तब केले. विरोधकांमधील समन्वयाचा अभाव आणि सहकार पॅनेलची संघटनात्मक ताकद या गोष्टींचा अंतिम निकालावर मोठा परिणाम दिसून आला. २०२१ ची ती निवडणूक आजही कृष्णा कारखान्याच्या राजकारणात “सत्तेचा निर्णायक टर्निंग पॉइंट” म्हणून ओळखली जाते.
आता २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तोच इतिहास चर्चेत आला आहे. पण -- आजची वेळ ही इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची आहे की तो बदलून जाण्याची..?
हे मात्र येणारा काळच ठरवेल.

कृष्णा कारखाना २०२१ चा निकाल -
गट क्रमांक 1 - वडगाव हवेली-दुशेरे गट
१ जगदीश दिनकर जगताप (वडगाव) कपबशी १९५१३ (विजयी)
२ धोंडीराम शंकर जाधव (दुशेरे) कपबशी २००६५ (विजयी)
३ सयाजी रतन यादव (येरवळे) कपबशी १९४०४ (विजयी)
४ उत्तमराव तुकाराम पाटील (दुशेरे) नारळ ८४०४
५ अशोक मारुती जगताप (वडगाव) नारळ ९१०४
६ सर्जेराव रघुनाथ लोकरे (येरवळे) नारळ ८६९९
७ डॉ. सुधीर शंकरराव जगताप (वडगाव) शिट्टी ४५९६
८ बापुसो भानुदास मोरे (कोडोली) शिट्टी ४१९६
९ सुभाष रघुनाथ पाटील (येरवळे) शिट्टी ४२९०
गट क्रमांक 2 - काले-कार्वे गट
१ निवासराव लक्ष्मण थोरात (कार्वे) कपबशी १९६४७ (विजयी)
२ दयाराम भिमराव पाटील (काले) कपबशी २०३०७ (विजयी)
३ गुणवंतराव यशवंत पाटील (आटके) कपबशी १९७२६ (विजयी)
४ सुजित पतंगराव थोरात (कार्वे) नारळ ८३४४
५ विजयसिंह जयसिंग पाटील (आटके) नारळ ८४९३
६ पांडुरंग यशवंत पाटील (काले) नारळ ८७७०
७ अजित विश्वास पाटील (काले) शिट्टी ४१८०
८ सयाजीराव यशवंतराव पाटील (आटके) शिट्टी ४१९३
९ दत्तात्रय भगवान थोरात (कार्वे) शिट्टी ४१००
१० प्रमोद धनराज पाटील (आटके) अपक्ष अॅटोरिक्षा ३७
गट क्रमांक 3 - नेर्ले-तांबवे गट
१ लिंबाजी महिपतराव पाटील (तांबवे ता. वाळवा) कपबशी १९३४७ (विजयी)
२ संभाजीराव आनंदराव पाटील (नेर्ले) कपबशी १९८०१ (विजयी)
३ दत्तात्रय हणमंत देसाई (वाठार) कपबशी २०१०९ (विजयी)
४ सुभाष उद्धव पाटील (नेर्ले) नारळ ८८२७
५ विक्रमसिंह शहाजीराव पाटील (तांबवे) नारळ ८६२४
६ मारुती राजाराम मोहिते (बेलवडे बुद्रुक) नारळ ८९८४
७ गणेश ज्ञानदेव पाटील (तांबवे-ता. वाळवा) शिट्टी ४२०४
७ प्रशांत वसंतराव पाटील (नेर्ले) शिट्टी ४१९८
८ मनोहर रघुनाथ थोरात (कालवडे) शिट्टी ३९५८
गट क्रमांक 4 - रेठरे हरणाक्ष-बोरगाव गट
१ जितेंद्र लक्ष्मणराव पाटील (बोरगाव) कपबशी २०२१८ (विजयी)
२ संजय राजाराम पाटील (उरुण) कपबशी १९७८० (विजयी)
३ जयवंत दत्तात्रय मोरे (रेठरे हरणाक्ष) कपबशी २०१११ (विजयी)
४ शिवाजी आप्पासाहेब पवार (इस्लामपूर) नारळ ८५६०
५ महेश राजाराम पवार (रेठरे हरणाक्ष) नारळ ८८५९
६ उदयसिंह प्रतापराव शिंदे (बोरगाव) नारळ ८३७०
७ विश्वासराव संपतराव मोरे-पाटील (रेठरे हरणाक्ष) शिट्टी ४४१६
८ विवेकानंद भगवान मोरे (रेठरे हरणाक्ष) शिट्टी ४२०८
९ अनिल भिमराव पाटील (कामेरी) शिट्टी ४१५७
गट क्रमांक 5 - येडेमच्छींद्र-वांगी गट
१ शिवाजी बाबुराव पाटील (येडेमच्छिंद्र) कपनशी २०१५५ (विजयी)
२ बाबासो खाशाबा शिंदे (देवराष्ट्रे) कपबशी १९४८९ (विजयी)
३ बाबासो वसंतराव पाटील (येडेमच्छिंद्र) नारळ ८४३२
४ माणिकराव आनंदराव मोरे (देवराष्ट्रे) नारळ ८८१०
५ बापुसो गणपतराव मोरे (देवराष्ट्रे) शिट्टी ४१५७
६ संजय जगन्नाथ पाटील (येडेमच्छिंद्र) शिट्टी ४१९९
गट क्रमांक 6 - रेठरे बुद्रुक-शेणोली गट
१ सुरेश जयवंतराव भोसले (रेठरे बुद्रुक) कपबशी २०२७८ (विजयी)
२ बाजीराव दाजी निकम (शेरे) कपबशी १८५३९ (विजयी)
३ अविनाश जगन्नाथ मोहिते (रेठरे बुद्रुक) नारळ ९९६१
४ अधिकराव जयवंत निकम (शेरे) नारळ ७९३९
५ इंद्रजीत यशवंतराव मोहिते (रेठरे बुद्रुक) शिट्टी ४७५१
६ बापुसो नानासो पाटील (रेठरे खुर्द) शिट्टी ३३८५
इतर मागास प्रवर्ग राखीव-
१ वसंतराव बाबुराव (ज्ञानू) शिंदे कपबशी २०३२६ (विजयी)
२ मिलिंद पांडुरंग पाटणकर (कासारशिरंबे) नारळ ९१८६
३ शंकरराव ज्ञानदेव रणदिवे (कासेगाव) शिट्टी ४३७२
महिला राखीव -
१ जयश्री माणिकराव पाटील (बहे) कपबशी १९८७६ (विजयी)
२ इंदुमती दिनकर जाखले (नेर्ले) कपबशी १९५९४ (विजयी)
३ मीनाक्षीदेवी संभाजी दमामे (बहे) नारळ ८९१६
४ उमा अजित देसाई (काले) नारळ ८९३६
५ उषा संपतराव पाटील (शेरे) शिट्टी ४२५५
६ सत्वशीला उदयसिंह थोरात (बहे) शिट्टी ४६९४
४ कांचनमाला संभाजीराव जगताप (कोडोली) अपक्ष पतंग ४५
अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय प्रवर्ग-
१ विलास ज्ञानू भंडारे (टेंभू) कपबशी २०३३३ (विजयी)
२ शिवाजी उमाजी आवळे (शिरटे) नारळ ९२३०
३ अधिकराव लक्ष्मण भंडारे (टेंभू) शिट्टी ४३४४
विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र राखीव -
१ अविनाश मधुकर खरात (खरातवाडी ता. वाळवा) कपबशी २०१३४ (विजयी)
२ नितीन शंकर खरात (खरातवाडी ता. वाळवा) नारळ ८९२९
३ आनंदराव संभाजी मलगुंडे (कामेरी) शिट्टी ४४८९
४ शंकर दादू कारंडे (किल्ले मच्छिंद्रगड) अपक्ष टेलिफोन ३७

 (क्रमशः )

पुढच्या भागात -

भोसले पिता-पुत्रांनी कृष्णेचं मैदान नेमकं मारलं कसं ! (मागोवा).

➖➖➖➖➖➖➖➖➖

#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णानिवडणूक

#रेठरेबुद्रुक #सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल 

#रयतपॅनेल #चांगभलंन्यूज #चांगभलं #कराड 

#वाळवा #साप्ताहिकचांगभलं #कडेगाव 

#ChangbhalaNews #KrishnaSugarFactory

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या