हैबत आडके | चांगभलं, कराड
केंद्र सरकारकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटप करत अनोखे आंदोलन करण्यात आले. “मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?” या लोकप्रिय वाक्याचा संदर्भ घेत इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात आलेली कडवट परिस्थिती अधोरेखित करण्याचा प्रयत्न आंदोलनातून करण्यात आला.
या आंदोलनामध्ये सौ. सत्त्वशीला पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजित पाटील चिखलीकर, युवक काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अमित जाधव, तालुका अध्यक्ष देवदास माने, सातारा जिल्हा उपाध्यक्ष समीर इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष उदय जाधव, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, पंचायत समिती सदस्य रविंद्र बडेककर, कराड उत्तर अध्यक्ष प्रविण वेताळ, कराड दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय जमाले, कराड उत्तर उपाध्यक्ष शहानूर देसाई, जिल्हा सरचिटणीस उमर फारूक, कराड दक्षिण उपाध्यक्ष खालीद पटेल, पाटण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष रविराज पाटील यांच्यासह शिवाजीराव जमाले, तुषार लोंढे, दीलावर मुल्लानी, गणेश भोसले, सुरेश मदने, राहुल भिसे, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, डॉ. दत्ता मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणावर तीव्र टीका करण्यात आली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असून सरकारने तातडीने इंधन दर कमी करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#काँग्रेस #राष्ट्रीयकाँग्रेस #युवककाँग्रेस #पृथ्वीराजचव्हाण
#सातारा #कराड #काँग्रेसचेचॉकलेटआंदोलन #नामदेवपाटील
#अजितरावपाटीलचिखलीकर #देवदासमाने #चांगभलं
#चांगभलंन्यूज #चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं


0 टिप्पण्या