🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विश्वासू कार्यकर्त्याला काँग्रेसकडून मोठी जबाबदारी !

 



हैबत आडके | चांगभलं, कराड
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय तसेच काँग्रेसचे सक्रिय नेते नामदेव पाटील यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

यापूर्वी सहा महिन्यांपूर्वीच नामदेव पाटील यांच्याकडे कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अल्पावधीतच त्यांनी संघटनात्मक बांधणीसह पक्षवाढीसाठी प्रभावी काम करत आपला ठसा उमटवला. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी नेतृत्व करत पत्नी सुनंदा पाटील यांना विजयी केले. तसेच कराड पंचायत समितीच्या वारूंजी गणात रवींद्र बडेकर यांना विजयी करून या भागातील काँग्रेसचे वर्चस्व अधिक मजबूत केले.

गेल्या महिन्यात काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांनी जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्यावेळी नामदेव पाटील यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नामदेव पाटील म्हणाले की, “सर्वांना सोबत घेऊन सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.”

राजकारण, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात शून्यातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ५३ वर्षीय नामदेव पाटील यांनी वारूंजी गावचे सरपंच, कराड पंचायत समिती सदस्य, वीट भट्टी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळल्या आहेत.
त्यांच्या नियुक्तीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#काँग्रेस #राष्ट्रीयकाँग्रेस #नामदेवपाटील #सातारा #कराड 

#पृथ्वीराजचव्हाण #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलं 

#KaradNews #SataraNews #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या