🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

आझाद विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

 चांगभलं वृत्तसेवा | कराड

कासेगाव शिक्षण संस्थेचे आझाद विद्यालय व ज्युनियर कॉलेज ने यंदाच्या एस.एस.सी. तसेच एच.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाची सुंदर किनार लाभली आहे.
एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयाचा निकाल तब्बल ९७.४८% लागला. तर एच.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये सायन्स विभागाचा निकाल ९७.८५%, कॉमर्स विभागाचा निकाल ९७.४८%, आर्ट्स विभागाचा निकाल ८२% आणि एम.सी.व्ही.सी. विभागाचा निकाल ६८.५९% एवढा लागून विद्यालयाने सर्व स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केली.
एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी :प्रथम क्रमांक – श्रावणी किरण मोरे — ९५.२०%
द्वितीय क्रमांक – पूर्वा संतोष पाटील — ९४.६०%
तृतीय क्रमांक – श्रुतिका परशुराम चव्हाण — ९४.२०%
एच.एस.सी. सायन्स विभागातील गुणवंत :
प्रथम क्रमांक – अविष्कार वसंत मोरे — ८६.६७%
द्वितीय क्रमांक – पृथ्वीराज प्रशांत पाटील — ८५% तृतीय क्रमांक – ऋषिकेश बाजीराव पाटील — ८५% तृतीय क्रमांक – साहिल संजय निकम — ८४%
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील सचिव आर. डी. सावंत, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य एस. टी. आडके, सदस्य संजीव पाटील, प्रशासकीय समन्वयक बी. एल. सरनोबत, अधीक्षक ए. डी. पाटील, संस्था पर्यवेक्षक एस. एल. माने, एस. एम. पवार, बी. जी. शिंदे, मंजुषा कुलकर्णी , मुख्याध्यापक संजय पवार, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामुळे कासेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या