चांगभलं वृत्तसेवा | कराड
कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील ब्रह्मदास विद्यालयाच्या एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२६ च्या निकालात विराज रवींद्र थोरात यांनी कासेगाव केंद्रात व विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश मिळाले. सामान्य कुटुंबातील असलेल्या विराजने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळवले.
ग्रामीण भागातील ब्रह्मदास विद्यालय शैक्षणिक गुणवत्ता व क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यावर्षी विद्यालयाचा एकूण निकाल ९७.०१ टक्के लागला असून सेमी विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयामध्ये विशेष गुणवत्ता धारक २१, प्रथम श्रेणी २६, द्वितीय श्रेणी १५ तर तृतीय श्रेणी ०३विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विराज थोरात याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले. विराजने मिळवलेल्या या यशामुळे बेलवडेसह कालवडे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या यशाबद्दल मुख्याध्यापक जे. बी. माने, जी. व्ही. रणदिवे, बी. डी. पोरे, पी. टी. पाटील, सचिन पाटील, शिवाजी कोळी, अंकुश मोहिते, प्रवीणकुमार मोहिते यांनी अभिनंदन केले.
तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी विराजला त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्याध्यापकांचा संस्थेकडून सत्कार..
दरम्यान, कासेगाव केंद्रात शाळेच्या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ब्रह्मदास विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. बी. माने यांचा कासेगाव शिक्षण संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. 'हा सत्कार म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांनी दिलेले योगदान आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट याचा सन्मान' असल्याचे गौरवोद्गार मुख्याध्यापक माने यांनी सत्कारानंतर बोलताना काढले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



0 टिप्पण्या