रेठरे येथे महिला पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
चांगभलं प्रतिनिधी | कराड
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव आप्पा यांनी लावलेल्या कृष्णा उद्योग समूहाच्या वटवृक्षाने सर्वत्र विस्तार केला आहे. हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना पोशिंदा बनला आहे. निवडणुकीपूर्ती खोटी आश्वासने देणाऱ्या माणसांनी कारखान्याची काय अवस्था केली हे आपणास माहित आहे. एक निर्णय चुकल्यानंतर अनेक कुटुंबाला त्याची झळ सोसावी लागते, असे सांगून कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला विजयी करून डॉ. सुरेश भोसले यांचे हात बळकट करा , असे आवाहन कृष्णा औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांनी उपस्थित महिलांना केले.
रेठरे बुद्रुक ता. कराड येथे य. मो.कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ भव्य महिला पदयात्रा व आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी सौ. रंजनाताई मोहिते, सौ. हर्षदा मोहिते अन्य महिला यांची उपस्थिती होती.
सौ उत्तरा भोसले म्हणाल्या, अनेक नेते मंडळींनी कारखान्याच्या निवडणुकीत डॉ.सुरेश भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केलेल्या कामाची पोच म्हणून पाठिंबा दर्शवला आहे. कारखान्याची सूत्रे डॉ. सुरेश भोसले यांच्या हाती आल्यापासून सभासद शेतकरी कामगारांच्या हिताचे अनेक क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळेच आज लोकांचा एवढा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. येणाऱ्या काळात सुद्धा शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून कारखान्याच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. विरोधकांनी विरोधासाठी विरोध केला असून त्यांच्याकडे कोणतेही ठोस नियोजन प्लॅनिंग नाही. कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण हजारो लोकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून दिला असून अनेक कामे केली आहेत. आज कृष्णा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांच्या परिवाराचा पोशिंद्या बनला आहे. त्याला अधिक बळकट करणे, त्याचे संरक्षण करणे व त्याच्या पाठीशी राहणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. दरम्यान, महिलांच्या या रॅलीत गावातील सभासद महिला सहभागी झाल्या होत्या. फटाक्याची अतिषबाजी, घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दरम्यान, उत्तरा भोसले यांनी नुकत्याच उभारण्यात आलेल्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्या ठिकाणी सौ.राजनंदिनी सूर्यवंशी व महिलांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
उत्तरा भोसले यांचा वयोवृद्ध महिलांसोबत संवाद....
पदयात्रे दरम्यान श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समोरील पारावर उपस्थित असलेल्या वयोवृद्ध महिलांशी उत्तरा भोसले यांनी विविध विषयावर चर्चा करून संवाद साधला, त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णानिवडणूक
#रेठरेबुद्रुक #सहकारपॅनेल #चांगभलं #साप्ताहिकचांगभलं

0 टिप्पण्या