य. मो. कृष्णा कारखाना निवडणूक २०२६ : डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाला सभासदांचा कौल
हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी प्रारंभ झाला असून पहिल्या फेरीअखेर विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्वच गटांमध्ये भक्कम आघाडी घेतली आहे. तर अविनाश मोहिते व अर्चना मोहिते यांच्या नेतृत्वाखालील आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलला सर्वच गटांत पिछाडीचा सामना करावा लागत आहे.
पहिल्या फेरीतील मतमोजणीत सहकार पॅनेलच्या उमेदवारांना ११ हजार ते १२ हजार मतांचा टप्पा सहज पार करता आला असून अनेक उमेदवारांनी १२ हजारांहून अधिक मते मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे.
गट क्रमांक १ : वडगाव हवेली-दुशेरे
सहकार पॅनेलचे धोंडीराम जाधव यांना १२,६४५, जगदीश जगताप यांना १२,०६८ तर आनंदा खबाले यांना १२,३०८ मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत.
या गटात संस्थापक पॅनेलचे उमेदवार आनंदा जगताप यांना ४,८५८, प्रताप जगताप यांना ४,७८२ आणि दुर्योधन खबाले यांना ४,४३८ मते मिळाली आहेत.
गट क्रमांक २ : कार्वे-काले
सहकार पॅनेलचे उमेदवार अरविंद पाटील १२,५८२, दयाराम पाटील १२,२९४ आणि बाजीराव थोरात ११,९०८ मतांसह आघाडीवर आहेत.
संस्थापक पॅनेलचे संतोष थोरात ४,७७६, प्रतापराव पाटील ४,९३५ आणि शांताराम पाटील ४,५८३ मतांवर आहेत.
गट क्रमांक ३ : तांबवे-नेर्ले
सहकार पॅनलचे उमेदवार दत्तात्रय देसाई १२,५१८, लिंबाजी पाटील १२,२६२ आणि संभाजीराव पाटील १२,२३३ मतांसह पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.
संस्थापक पॅनेलचे उमेदवार सुरेश उर्फ सुभाष पाटील ४,५७९, सुभाष पाटील ४,९२२ आणि किरण पाटील ४,७६० मतांवर आहेत.
गट क्रमांक ४ : बोरगाव-रेठरे हरणाक्ष
सहकार पॅनेलचे उमेदवार जयवंत मोरे १२,५७८, सत्यजित पाटील १२,३३६ आणि सुनील पाटील १२,२६८ मतांसह आघाडीवर आहेत.
संस्थापक पॅनेलचे जयकर शिंदे ४,६८०, महेश पाटील ४,७७४ आणि उदयसिंह शिंदे ४,६०१ मते मिळवू शकले आहेत.
गट क्रमांक ५ : येडेमच्छिंद्र-वांगी
सहकार पॅनेलचे संग्राम पाटील १२,३४८ आणि बाबासो शिंदे ११,७२४ मतांसह आघाडीवर आहेत.
संस्थापक पॅनेलचे माणिकराव मोरे ४,७४० आणि सुरेश पाटील ४,६८६ मतांवर आहेत.
गट क्रमांक ६ : रेठरे बुद्रुक-शेणोली
सहकार पॅनेलचे उमेदवार तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन सुरेश भोसले यांना १२,६०० तर बाजीराव निकम यांना ११,२२० मते मिळाली असून पहिल्या फेरीत मोठी आघाडी मिळाली आहे.
संस्थापक पॅनेलचे उमेदवार, माजी चेअरमन अविनाश मोहिते ५,४७६ आणि दीपक कणसे ४,५९१ मतांवर आहेत.
महिला राखीव गट
पहिल्या फेरीत सहकार पॅनेलच्या सुजाता जाधव यांना ११,९३० आणि सुनिता शेवाळे यांना ११,९३७ मते मिळाली असून त्या आघाडीवर आहेत.
संस्थापक पॅनेलच्या अर्चना मोहिते यांना ५,५८९ तर विजया पाटील यांना ४,८११ मते पहिल्या फेरीत मिळाली आहेत.
अनुसूचित जाती-जमाती राखीव गट
सहकार पॅनेलचे छगन कांबळे १२,६०५ मतांसह आघाडीवर आहेत. संस्थापक पॅनेलचे सुधीर रोकडे यांना ४,९७४ मते मिळाली.
भटक्या विमुक्त जाती-जमाती / विशेष राखीव गट
सहकार पॅनेलचे अविनाश खरात यांना १२,४६३ तर संस्थापक पॅनेलचे दिलीप गलांडे यांना ५,१२७ मते मिळाली.
इतर मागास प्रवर्ग राखीव गट
सहकार पॅनेलचे बाळासो जगताप यांनी १२,७६८ मते मिळवत सर्वाधिक मतांची नोंद केली. संस्थापक पॅनेलचे प्रशांत बाळकृष्ण श्रीखंडे यांना पहिल्या फेरीत ४,८२२ मते मिळाली आहेत.
चित्र स्पष्ट...
पहिल्या फेरीतील मतमोजणीत सर्वसाधारण, महिला, अनुसूचित जाती-जमाती, विशेष राखीव तसेच इतर मागास प्रवर्ग अशा सर्वच गटांमध्ये सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याने कारखान्यावर पुन्हा एकदा भोसले गटाचे वर्चस्व कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र मतमोजणीच्या पुढील फेऱ्या बाकी असल्याने अंतिम निकालाकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.
रेठरे बुद्रुकसह कार्यक्षेत्रात जल्लोष...!
सहकार पॅनेल पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतल्याने विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या रेठरे बुद्रुक गावासह संपूर्ण कारखाना कार्यक्षेत्रात सहकार पॅनलच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची प्रचंड उधळण करत, फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून एकच जल्लोष केला. विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णाकारखाना
#सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल #रेठरेबुद्रुक #चांगभलं
#चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक






0 टिप्पण्या