हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
शेरे ता. कराड येथील शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम अधिक उत्पादनक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने 'खरीप हंगामपूर्व तयारी' मेळाव्याचे अत्यंत उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
अधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती...
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी मा. प्रशांत शेंडे साहेब, मंडळ कृषी अधिकारी मा. विनोद कदम साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी सारिका सरगर, विक्रम नलवडे, सारिका औताडे आणि रूपाली कुवर उपस्थित होते. तसेच शेरे गावातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव निकम (आबा ), शेरे विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील (तात्या), उमेद चे रेठरे प्रभाग समन्वय सुशांत तोडकर आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत निवड झालेल्या 'नीनाई' व 'शेराई' शेतकरी महिला बचत गटाच्या सदस्यांची उपस्थिती या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरली.
ऊस शेतीत 'A.I.' तंत्रज्ञानाचा वापर; तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन...
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना तालुका कृषी अधिकारी मा. प्रशांत शेंडे साहेब यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आधुनिक दिशा दाखवली. शेंडे साहेब यांनी आपल्या ओघवत्या आणि अभ्यासू शैलीत 'एल निनो'च्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या उपाययोजनांची सविस्तर मांडणी केली. विशेषतः ऊस पिकामध्ये 'A.I. टेक्नॉलॉजी'चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रभावी वापर करून उत्पादन खर्च कसा कमी करावा आणि उत्पादन कसे वाढवावे, याबद्दल त्यांनी केलेले मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरले.
योजनांची माहिती आणि बीजप्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक...
मंडळ कृषी अधिकारी मा. विनोद कदम साहेब यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती सारिका औताडे यांनी खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या 'बियाणे उगवण क्षमता तपासणी' आणि 'बीज प्रक्रिया' या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना अचूक मार्गदर्शन केले
बियाणे वाटप व 'उमेद'चे सहकार्य...
या कार्यक्रमाचे विशेष औचित्य साधून राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत निवड झालेल्या 'नीनाई' आणि 'शेराई' शेतकरी महिला बचत गटातील सदस्य महिलांना शासनाच्या वतीने बियाण्यांचे अधिकृत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे म्हणजेच 'उमेद'चे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, 'नीनाई' व 'शेराई' महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती जाधव यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे मनापासून आभार मानले. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नेहमीच आम्हाला मोलाचे सहकार्य करतात, हीच आमच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व आभार प्रदर्शन...
हा महत्वपूर्ण हंगामपूर्व मेळावा राबवत असताना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी माननीय समीर पवार साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. विक्रम नलवडे यांनी मानले. या मेळाव्यामुळे शेरे आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आगामी खरीप हंगामासाठी एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#शेरे #खरीपहंगाम२०२६ #कृषीविभाग #कराड #चांगभलं
#ऊसशेती #Aiतंत्रज्ञान #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंन्यूज
#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #Karad

0 टिप्पण्या