🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

पट्टणकडोली येथे "भंडारा" चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा उत्साहात

 


अध्यात्म, परंपरा आणि युवाशक्तीचा संगम घडवणारा चित्रपट "भंडारा"

चांगभलं प्रतिनिधी कोल्हापूर |


श्री विठ्ठल बिरदेव फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि अध्यात्म, संस्कृती तसेच युवा पिढीच्या विचारविश्वाला स्पर्श करणारा बहुचर्चित मराठी चित्रपट "भंडारा" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान, पट्टणकडोली (जि. कोल्हापूर) येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
समस्त धनगर समाज, पुजारी समाज आणि भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला. श्री विठ्ठल बिरदेवांच्या पावन सान्निध्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे दर्शन घडवले.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश ननावरे, छायाचित्रकार अशोक महाजन, कार्यकारी निर्माता विनायक ढेरंगे, निर्मिती व्यवस्थापक नवीन भालेराव तसेच चित्रपटाचे मार्गदर्शक निलेश बाळू कोळेकर महाराज (निळोबा पुजारी, माणदेश) यांच्यासह देवस्थानाशी संबंधित मान्यवर आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
चित्रपटाविषयी दिग्दर्शक रमेश ननावरे यांनी सांगितले की, "भंडारा" हा केवळ मनोरंजनात्मक चित्रपट नसून युवा पिढीला आपल्या संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माशी जोडणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
आधुनिक जीवनाच्या धकाधकीत अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करत समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल बिरदेव यांच्या कृपाशिर्वादाने आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे पार पडलेला हा टायटल लॉन्च सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. चित्रपटाच्या शीर्षक घोषणेनंतर उपस्थितांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖

✅ ही बातमी ई पेपर स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करून डाऊनलोड करा. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या