हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो.चंद्रशेखर पाटील आणि सेक्रेटरीपदी रो.सुनील चाळके यांची निवड झाली आहे. रोटरी वर्ष २०२६–२७ साठी नव्याने संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ कराडच्या उपाध्यक्षपदी रामचंद्र लाखोले, खजिनदारपदी प्रबोध पुरोहित, क्लब ट्रेनर पदी शशांक पालकर यांच्यासह विविध विभागांचे संचालक म्हणून गजानन कुसुरकर, राजगौंडा अपिने, रवींद्र देशमुख, प्रताप मोरे, राहुल कुलकर्णी, जगदीश वाघ, डॉ.राहुल फासे, चंद्रकुमार डांगे, आनंदा थोरात, अनघा बर्डे, डॉ.भाग्यश्री पाटील, शिवराज माने, राहुल पुरोहित, किरण जाधव, डॉ.शुभांगी पाटील, गजानन माने, डॉ.सविता मोहिते, डॉ.शेखर कोगनुलकर, , डॉ.अस्मिता फासे, विनायक राऊत, बद्रीनाथ धस्के, अशोक इंगळे, सीमा धर्मजिज्ञासू, सूर्यकांत भोसले, अभय पवार, रघुनाथ डुबल, सुहास पवार, विनायक माळी, डॉ.श्रुती शहा, जयंत जगताप यांची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी विविध कार्यांची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
यावर्षी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून रो.जयेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली रोटरी ३१३२ डिस्ट्रिक्टमध्ये सामाजिक कार्य होणार आहे. या डिस्ट्रिक्टमध्ये ११ जिल्ह्यांचा समावेश असून जवळपास १०९ क्लब आहेत.
रोटरी क्लब ऑफ कराड चे हे ७० वे वर्ष आहे. आज अखेर रोटरी क्लब कराडने कराड व परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य केले आहेत . रोटरी वर्ष सन २०२६–२७ या वर्षासाठी निवड झालेल्या रोटरी क्लब ऑफ कराडच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नूतन अध्यक्ष रो.चंद्रशेखर पाटील म्हणाले, यावर्षी ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर आधारित असलेल्या ॲनिमिया फ्री इंडिया प्रोजेक्ट, कर्करोगाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, हँड्स फॉर ह्युमॅनिटी प्रोजेक्ट, अन्नछत्र प्रकल्पांतर्गत द.शि.एरम मूकबधिर शाळा येथे पौष्टिक आहार वाटप, गर्भसंस्कार शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, पर्यावरण संवर्धन अंतर्गत सीडबॉल निर्मिती व वृक्षारोपण, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, स्विमिंग कॉम्पिटिशन, ॲथलेटिक्स स्पर्धा हे प्रमुख असलेले प्रकल्प चालू ठेवत इतर प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहेत.
सेक्रेटरी रो.सुनील चाळके म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून आगामी काळात सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थी, दिव्यांगांसाठी व महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येणार असून, यावर्षी शांतता आणि संघर्ष प्रतिबंध, रोगप्रतिबंध आणि उपचार, पाणी, स्वच्छता व स्वच्छता, माता आणि बालकांचे आरोग्य, मूलभूत शिक्षण आणि साक्षरता, आर्थिक आणि सामुदायिक विकास, निसर्गाचे संवर्धन या रोटरीच्या सात फोकस एरियावर काम होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #रोटरीक्लब #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर
#चांगभलंसाप्ताहिक #चांगभलं #साप्ताहिकचांगभलं

0 टिप्पण्या