🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

आशियाई विकास बँक प्रकल्पांतर्गत कराड दक्षिणमधील रस्ते विकासासाठी १३९ कोटींचा निधी मंजूर

 


आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश; कराड दक्षिणच्या विकासाला मिळणार मोठी चालना

हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील रस्ते विकासासाठी आशियाई विकास बँक प्रकल्पांतर्गत १३९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या निधीतून कार्वे चौकी ते ओगलेवाडी विभाग (कि.मी. १०४/८०० ते ११८/७००) या टप्प्यात काम करण्यात येणार आहे. या रस्ते विकासामुळे कराड दक्षिणमधील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जाणारा खंडाळा - कोरेगाव - कराड - सांगली - शिरोळ राज्य महामार्ग क्र. १४२ हा पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. कराड शहरातील वाढती नागरी व आंतरजिल्हा वाहतूक, औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनांची वर्दळ तसेच ऊस वाहतूक यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

तसेच या मार्गावरील बनवडी फाटा, ओगलेवाडी चौक, स्टेशन जंक्शन व कार्वे चौकी ही महत्त्वाची वाहतूक केंद्रे असून, या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँक प्रकल्पांतर्गत निधी मंजूर करण्याची मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

या मागणीची दखल घेत, या रस्ते विकासासाठी तब्बल १३९ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे या मार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण होणार असून, नागरिकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तसेच औद्योगिक विकास, व्यापार आणि ग्रामीण, शहरी संपर्क अधिक वेगाने वाढण्यास मदत होणार आहे. कराड दक्षिणमधील ग्रामस्थांमधून या निर्णयाचे स्वागत होत असून, याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह महायुती सरकारचे अभिनंदन केले जात आहेत.


➖➖➖➖➖➖➖➖➖

#कराडदक्षिण #अतुलबाबाभोसले #भाजप #रस्तेविकास

#कराडदक्षिणभाजप #कार्वेचौकीतेओगलेवाडीरस्ता

#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूज

#चांगभलं #चांगभलंन्यूजपेपर #दैनिकचांगभलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या