🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड बसस्थानक परिसरात मंगळसूत्र हिसकावणाऱ्या पती-पत्नीला अटक; चार गुन्ह्यांची उकल, दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त

 


हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

कराड बसस्थानक परिसरात महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पती-पत्नीच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखी तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास कराड बसस्थानकाजवळील नवग्रह मंदिर परिसरातून एसटी स्थानकाकडे पायी जात असलेल्या एका महिलेला काळ्या रंगाचा टॉप परिधान केलेल्या महिलेसह पांढरा शर्ट घातलेल्या पुरुषाने अडवले. जीवे मारण्याची धमकी देत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तिला ढकलून खाली पाडत दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील हालचालींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये संशयित महिला व पुरुष घटनेपूर्वी परिसरात वावरताना आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रेकॉर्डवरील संशयित श्रावण राजेश कांबळे (वय 33) व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे (वय 27, दोघेही रा. कराड) यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर 23 जून रोजी दोघांना अटक करण्यात आली.
पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेले सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. पुढील तपासात संशयितांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी तीन जबरी चोरीचे गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे या कारवाईत एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक (गुन्हे प्रकटीकरण शाखा) निखील मगदूम, पोलीस हवालदार वसीम संदे, सतीश पाटील, संदीप कुंभार, पोलीस नाईक सज्जन जगताप, पोलीस नाईक अनिल स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल धिरज कोरडे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मोहसीन मोमीन, महेश पवार, निलेश विभुते, आनंदा जाधव तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली पिसाळ यांनी सहभाग घेतला.


✅ ही बातमी ई पेपर स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा. 👇🏻


#कराड #KaradNews #KaradCrimeNews

#ChangbhalaNews #Changbhala

#ChangbhalaNewspaper

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या