🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

पत्रकार संभाजी थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त २ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 


सामाजिक उपक्रमात रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन; दात्यांना आकर्षक गिफ्ट सोबत आंब्याचे रोपही दिले जाणार


चांगभलं प्रतिनिधी | कराड


शिवनेरी उद्योग समूह, मैरवनाथनगर-कालेचे प्रमुख तथा साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार संभाजी दत्तात्रय थोरात (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. संभाजी थोरात बाबा मित्रपरिवार यांच्याकडून करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर श्री शिवनेरी ढाबा (अख्खा मसूर स्पेशल), धोंडवाडी फाटा, मैरवनाथनगर-काले येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास शिवनेरी उद्योग समूहाकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. यामध्ये हेल्मेट, मिल्टन वॉटर बॉटल, थर्मास व कप कॉम्बो तसेच मिल्टनचा तीन कप्प्यांचा जेवणाचा डबा यांसारख्या उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक रक्तदात्यास एक आंब्याचे रोप भेट म्हणून दिले जाणार आहे.



"एक रक्तदाता... अनेक जीवांना जीवनदान!" हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या रक्तदान शिबिराचे आयोजन संभाजी थोरात (बाबा) मित्रपरिवार यांनी केले असून, सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूरचे श्री. तातोबा सावकर पवार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
"वाढदिवस साजरा रक्तदानाने... जीवन वाचवा मानवतेने!" या संदेशातून हा उपक्रम समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖

#संभाजीथोरात #पत्रकार #काले #शिवनेरीउद्योगसमूह

#कराड #सातारा #कोल्हापूर #चांगभलं #चांगभलंन्यूज

#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूजपेपर

#रक्तदानशिबिर #KaradNews #Kale

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या