धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात येत्या गळीत हंगामासाठी श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी ‘जयवंत शुगर्स’चे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, सरव्यवस्थापक (टेक्निकल) ए. बी. खटके आदी मान्यवर उपस्थित होते.
धार्मिक विधी झाल्यानंतर श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ओ.एस.डी. दादासाहेब मोहिते, वसंतराव पवार, आनंदा पाटील, एम. के. कापूरकर, नाना शेळके, ‘जयवंत शुगर्स’चे वर्क्स मॅनेजर एच. एम. नदाफ, प्रॉडक्शन मॅनेजर बी. जी. चव्हाणके, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट, डिस्टीलरी मॅनेजर व्ही. जी. म्हसवडे, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, ईडीपी मॅनेजर ए. एल. काशीद, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, सी.एच.आर. मॅनेजर व्ही. पी. जोशी, डेप्यु. चिफ अकौंटंट दिलीप पेन्टेवार, सुरक्षा अधिकारी व्ही. टी. भोसले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#जयवंतशुगर #अतुलबाबाभोसले #कराड #धावरवाडी
#चांगभलंन्यूज #चांगभलं #चांगभलंसाप्ताहिक
#चांगभलंन्यूजपेपर #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंNews

0 टिप्पण्या