🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

MS-CIT ला राष्ट्रीय SKOCH Award; कराडच्या सनबिम इन्फोकॉम प्रा. लि.कडून विद्यार्थी-पालकांचे अभिनंदन

 कराडच्या सनबिम इन्फोकॉम प्रा. लि.कडून MS-CIT च्या राष्ट्रीय यशाचा गौरव; प्रतिष्ठित SKOCH Award मुळे विद्यार्थी-पालकांमध्ये आनंद



हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

कराड येथील सनबिम इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड (Sunbeam Infocom Pvt. Ltd.) या MKCL सातारा जिल्हा समन्वयक संस्थेने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब जाहीर केली आहे. डिजिटल साक्षरतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या MS-CIT (Maharashtra State Certificate in Information Technology) या अभ्यासक्रमाला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award प्राप्त झाला असून, या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, प्रशिक्षण केंद्रप्रमुख आणि प्रशिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यासंदर्भात सनबिम इन्फोकॉम प्रा. लि., कराड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल लिटरसी (Digital Literacy) या श्रेणीत MS-CIT ला हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक समावेशन, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमांना दिला जाणारा SKOCH Award हा देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात, हा पुरस्कार MKCL बरोबरच गेल्या २५ वर्षांपासून MS-CIT वर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, पालक, प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षक, समन्वयक आणि संपूर्ण MKCL परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.
सनबिम इन्फोकॉम प्रा. लि.ने सांगितले की, गेल्या २५ वर्षांत MS-CIT च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक डिजिटलदृष्ट्या सक्षम झाले आहेत. अनेकांना रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता आणि कौशल्य विकासाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या युगात नागरिकांना डिजिटल आणि AI साक्षर बनविण्यासाठीही MS-CIT महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
या राष्ट्रीय सन्मानाबद्दल सनबिम इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड, कराड यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व MS-CIT प्रशिक्षण केंद्रप्रमुख, समन्वयक, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करत, भविष्यातही डिजिटल व AI साक्षर, कौशल्यसंपन्न आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

Sunbeam Infocom Karad
सनबिम इन्फोकॉम प्रा. लि. कराड
MKCL सातारा जिल्हा समन्वयक
MS-CIT SKOCH Award
Digital Literacy Maharashtra
MKCL News
SKOCH Award 2026
MS-CIT Award

#SunbeamInfocom #Karad #MKCL #MSCIT #SKOCHAward #DigitalLiteracy #Satara #Education #SkillDevelopment #DigitalMaharashtra #AILiteracy #ChangbhalaNews #सनबीम #चांगभलं

#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंन्यूजपेपर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या