हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सलग तीन वेळा चेअरमनपदी डॉ. सुरेशबाबा भोसले यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे (भारत सरकार) स्वतंत्र संचालक ना. भरत पाटील यांच्या हस्ते व शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार, माजी मंत्री शिवाजीराव नाईक तसेच भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. सुरेशबाबा भोसले यांचे सहकार पॅनल सर्वात मताधिक्य मिळवत विजयाची हॅट्रिक केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची सर्वांगीण प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त केला. कारखान्याच्या विकासासाठी सभासद, संचालक मंडळ आणि सर्व घटकांना विश्वासात घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज करण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले म्हणाले, "भरत पाटील नाना, तुम्हालाच आमच्यासाठी वेळ मिळतो, हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला नेहमीच बळ मिळते. कारखान्याच्या प्रगतीसाठी आपण दिलेले सहकार्य आणि पाठबळ पुढेही कायम राहील", अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
➖ क्षणचित्रे ➖
🔸यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश बाबा भोसले यांची सर्वानुमते निवड
🔸राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक मा. नामदार भरत पाटील (नाना) यांच्या हस्ते सत्कार.
🔸माजी मंत्री शिवाजीराव नाईक व भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती.
➖➖➖➖➖➖➖➖
#डाॅसुरेशभोसले #भरतपाटील #शिवाजीरावनाईक #सम्राटमहाडिक
#चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर #साप्ताहिकचांगभलं
#चांगभलंसाप्ताहिक #चांगभलं #चांगभलंNews #कृष्णाकारखाना

0 टिप्पण्या