चांगभलं प्रतिनिधी | कराड
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्यावतीने डॉक्टर्स डे चे औचित्य साधून एक सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला. क्लबच्या अंतर्गत 'जीवनधारा' प्रकल्पांतर्गत सह्याद्री हॉस्पिटलमधील डायलिसिस रुग्णांना आवश्यक मदत सुपूर्द करण्यात आली. डायलिसिसच्या रुग्णांना क्लबच्यावतीने प्रत्येक रुग्णांना सपोर्ट बेल्ट, पेन रिलीफ ऑइलचे वाटप करण्यात आले.
डॉक्टरांच्या अमूल्य सेवेसाठी त्यांचा क्लबच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी हॉस्पिटलच्यावतीने क्लब सदस्यांचे स्वागत करण्यात आले व क्लबच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट छाया पवार, प्रेसिडेंट मनीषा पाटील, सेक्रेटरी हेमलता फुटाणे, विद्या पावसकर, रतन शिंदे, विजयश्री मोहिते, सारिका शाह, शिवांजली पाटील, नंदा आवळकर , अमृता उकिरडे, वंदना केंजळे, वैशाली इंगवले आदी सदस्य उपस्थित होत्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#इनरव्हीलक्लबऑफकराडसंगम #जीवनधारा #डॉक्टर्सडे
#कराड #कराडन्यूज #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलं
#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या