चांगभलं प्रतिनिधी | कराड
नांदगाव ता.कराड येथील आनंदा रघुनाथ पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. याबाबतचे निर्देश महाराष्ट्र शासनाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
त्यानुसार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्तीचे पत्र तसेच ओळखपत्र नुकतेच आनंदा पाटील यांना प्रदान करण्यात आले आहे. या विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यकाळ वय वर्षे ६५ पर्यत असणार आहे. आनंदा पाटील यांना सन २०२१ ते २०२२ ला कामगार कल्याण मंडळाकडून विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्राचे त्यावेळचं राज्यपाल रमेश बैस व कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते तो पुरस्कार आनंदा पाटील यांनी स्वीकारलेला आहे.
आनंदा पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर,नांदगाव ग्रामस्थ मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
✅ ही बातमी ई पेपर स्वरूपात खालील इमेज वरून डाऊनलोड करू शकता.


0 टिप्पण्या