🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सांगली दौऱ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सुनीलभाऊ तोरणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 


चांगभलं प्रतिनिधी | सांगली

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले यांच्या सांगली दौऱ्यानिमित्त सांगली येथील गेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खानापूर तालुका व कलाकार संघटना सांगली जिल्हा यांच्यावतीने त्यांचे उत्साहपूर्ण व हार्दिक स्वागत करण्यात आले.

यावेळी कलाकार संघटना सांगली जिल्हाध्यक्ष तथा होलार समाज घरनिकीचे अध्यक्ष सुनिल तोरणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते केक कापून तसेच पुष्पगुच्छ देऊन सुनील तोरणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करत वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.

या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे विविध पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यामध्ये सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष श्वेत भैया कांबळे, खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे, सांगली जिल्हा वकील संघटना अध्यक्ष तुषार लोंढे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, मुस्लिम आघाडी खानापूर तालुका अध्यक्ष बशीरभाई मुजावर, आयटी सेल खानापूर तालुका अध्यक्ष साहिल वाघमारे, खानापूर तालुका उपाध्यक्ष गणेश लोखंडे, खानापूर तालुका संघटक नागेश कांबळे, मच्छिंद्र यादव तसेच आयटी सेल सांगली जिल्हाध्यक्ष विशाल काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्याशी विविध सामाजिक, संघटनात्मक व जनहिताच्या विषयांवर चर्चा केली. 

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात पार पडला. उपस्थितांनी सुनील तोरणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

✅ ही बातमी खालील इमेज वर क्लिक करून ई पेपर स्वरूपात डाऊनलोड करू शकता. 


🎥◀️ या बातमीचा व्हिडिओ खालील बटनावर क्लिक करून पाहू शकता...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या