हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी सातारा
Satara Heavy Rain Update: सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून Mahabaleshwar Rainfall आणि Koyna Dam Water Level या दोन्ही घडामोडींनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. पश्चिम घाटमाथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD Red Alert) इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Mahabaleshwar Rainfall: २४ तासांत 513 मिमी विक्रमी पाऊस...
महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत 513.0 मिमी पावसाची नोंद झाली असून हा Extremely Heavy Rainfall प्रकारातील पाऊस आहे. महाबळेश्वर येथे किमान तापमान 18.4°C, आर्द्रता 100% आणि हंगामातील एकूण पर्जन्यमान 1,717.4 मिमी झाले आहे. अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून लिंगमळा धबधब्यासह काही पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
Satara City Rain Update...
सातारा शहरात गेल्या २४ तासांत 55 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील किमान तापमान 21.9°C, आर्द्रता 95% असून हंगामातील एकूण पर्जन्यमान 214.6 मिमी झाले आहे.
Koyna Dam Water Level Today: 78,322 क्युसेक्स आवक...
सततच्या मुसळधार पावसामुळे Koyna Dam Water Level झपाट्याने वाढत आहे.
पाणीपातळी : 631.546 मीटर (2072 फूट)
जिवंत पाणीसाठा : 22.54 टीएमसी (22.51%)
धरणात आवक : 78,322 क्युसेक्स
विसर्ग : सध्या नाही
गेल्या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Morna Dam Update...
मोरणा धरण परिसरात 294 मिमी पावसाची नोंद झाली असून धरणात 69.42% पाणीसाठा झाला आहे. धरणातून 3,253 क्युसेक्स विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जोर येथे सर्वाधिक 547 मिमी पाऊस...
जिल्ह्यातील प्रमुख पर्जन्यमान (मिमी):
जोर – 547
सोनत – 373
सांडवली – 305
कास – 303
मोरणा – 294
नवजा – 266
कोयनानगर – 258
धोम-बळकवडी – 249
धोम – 204
ठोसेघर – 196
बामणोली – 195
रांजणी – 193
मेढा – 169
Landslide Update: केळघर घाटात दरड कोसळली...
मेढा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवून रस्ता खुला करण्याचे काम सुरू केले. नारळवाडी येथे झाड कोसळल्यानेही वाहतूक विस्कळीत झाली.
आनेवाडी-मर्ढे पुलावरून एकजण वाहून गेला...
भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील आनेवाडी–मर्ढे पुलावरून पाणी वाहत असताना इशारा दुर्लक्षित करून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणारी एक व्यक्ती प्रवाहात वाहून गेली. शोधकार्य सुरू आहे.
खंडाळा तालुक्यात नुकसान...
मिरजे येथे जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळून एका गोठ्यातील शेळी व करडू दगावले. भादे येथे घराची भिंत कोसळली असून सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, काल झालेल्या पावसामुळे व वाऱ्यामुळे मौजे कारी येथील जि.प.प्राथमिक शाळेचा पत्रा उडून जाऊन नुकसान झाले आहे.
Shivendrasinhraje Bhosale यांनी केली पाहणी...
मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली. बोगद्याला कोणतीही हानी झाली नसून मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश...
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व शासकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. दरडप्रवण भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, आरोग्य, वीज, रस्ते व आपत्कालीन यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे पथक कराड येथे तैनात असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
प्रमुख धरणांतील पाण्याची आवक...
कोयना – 78,322 क्युसेक्स
कण्हेर – 13,575 क्युसेक्स
धोम – 11,087 क्युसेक्स
धोम-बळकवडी – 7,157 क्युसेक्स
उरमोडी – 4,873 क्युसेक्स
तारळी – 3,950 क्युसेक्स
Satara Flood Update: प्रशासनाचे आवाहन...
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले, पूरग्रस्त भाग, धबधबे आणि दरडप्रवण क्षेत्रांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेऊन अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
Tags:
Satara Heavy Rain, Satara Flood Update, Mahabaleshwar Rainfall, Koyna Dam Water Level, Satara News Today, Maharashtra Rain News, IMD Red Alert, Breaking News Maharashtra, Changbhala News, Satara Weather Update #ChangbhalaNews #चांगभलंन्यूज #SataraHeavyRainUpdate #चांगभलंसाप्ताहिक
#साप्ताहिकचांगभलं #चांगभलं #सातारापाऊसअपडेट







0 टिप्पण्या